आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोमूत्रात अतिशय हानिकारक जीवाणू असून ते कोणत्याही स्थितीत मानवास पिण्यायोग्य नसल्याचा दावा भारतीय पशू संशोधन संस्थेने केला आहे. त्यामुळे कुणीही गोमूत्राचे सेवन करणे टाळले पाहिजे असेही संस्थेने म्हटले आहे. संस्थेच्या एका अहवालातून हा दावा करण्यात आला आहे.
म्हशीचे मूत्र प्रभावी
गायीपेक्षा म्हशीच्या मूत्रात जीवाणुरोधी घटक जास्त प्रभावी असल्याचा दावाही यात करण्यात आला आहे. संस्थेत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधन अहवालात या बाबी दिसून आल्या आहेत. गाय आणि सांडांच्या मूत्रात एस्चेरिचिया कोलाईसह सुमारे 14 प्रकारचे हानिकारक जीवाणू असतात. यामुळे पोटात संसर्गाची शक्यता असल्याने त्याचे सेवन टाळावे असे यात म्हटले आहे.
रिसर्चगेटवर अहवाल प्रकाशित
हा अहवाल रिसर्चगेट या संकेतस्थळावर प्रकाशित झाला आहे. गाय, म्हैस आणि मानवाच्या 73 मूत्र नमुन्यांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की म्हशीच्या मूत्रात जीवाणूरोधी हालचाली गोमूत्राच्या तुलनेत जास्त आहे असे महामारी विज्ञान विभागाचे प्रमुख म्हणाले.
गोमूत्राची शिफारस केली जाऊ शकत नाही
स्थानिक डेअरी फार्ममधून साहिवाल, थारपारकर आणि विंदावानी अशा तीन प्रकारच्या गायींचे आणि म्हैस तसेच मानवाचेही नमुने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जून 2022 ते नोव्हेंबर 2022 पर्यंत केलेल्या संशोधनातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कोणत्याही स्थितीत मानवांना गोमूत्राची शिफारस केली जाऊ शकत नाही असे संशोधनातून दिसून आल्याचे ते म्हणाले.
ही बातमीही वाचा...
सुपर फूड:शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी अन्न, ते परिपूर्ण बनवण्यात ठरते सहायक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.