आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • COWIN Registration Open Update: Registration For All Indians Aged Above 18 In Next 48 Hours On Cowin Platform

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

18+ वयाच्या लोकांचे व्हॅक्सीनेशन:24 एप्रिलपासून Co-Win पोर्टलवर सुरू होणार रजिस्ट्रेशन; 1 मेपासून या एज ग्रुपच्या लोकांनाही दिली जाणार लस

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 मेपासून 18 वर्षांच्या वयाच्या लोकांचेही लसीकरण

देशात 18 आणि यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या व्हॅक्सीनेशनसाठी रजिस्ट्रेशन 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. व्हॅक्सीनचा डोस घेण्यासाठी Co-Win पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते. एक मेपासून या एज ग्रुपच्या लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात होईल. Co-Win चीफ आर शर्मा यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

1 मेपासून 18 वर्षांच्या वयाच्या लोकांचेही लसीकरण
यापूर्वी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्च-स्तरीय बैठकीत 18+चे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीकडून जारी होणारे 50% डोज केंद्र सरकारला मिळतील आणि इतर 50% स्टॉक राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विकले जाऊ शकेल. सध्या देशात 45 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण केले जात आहे.

कोविड-19 व्हॅक्सीन घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?
रजिस्ट्रेशन केल्याशिवाय मिळणार नाही लस
तुम्ही पहिलेच रजिस्ट्रेशन करुन अपॉइंटमेंट बुक करु शकता. यासाठी कोरोना व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क (Co-Win)प्लॅटफॉर्म बनवला आहे. या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर व्हॅक्सीनेशनसंबंधीत प्रत्येक डेटा उपलब्ध असेल. काही सेंटर्सवर वॉक-इन सुविधाही असेल.

रजिस्ट्रेशन कसे होईल?
आरोग्य सेतु अॅप्लिकेशन आणि कोविन वेबसाइट (cowin.gov.in) वर रजिस्ट्रेशन होत आहे. यासाठी तुम्हाला हे करावे लागेल -

  1. मोबाइल नंबरला OTP ने व्हेरिफाय करावे लागेल.
  2. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कोणत्याही इतर फोटो ओळख पत्राच्या आधारावर आपली माहिती सबमिट करावी लागेल.
  3. पिनकोड इत्यादी टाकून व्हॅक्सीनेशन साइट, तारीख आणि वेळ निवडावी लागेल.
  4. एका मोबाइल नंबरवरुन जास्तीत जास्त चार लोकांचे रजिस्ट्रेशन होऊ शकेल.

वॉक-इनची सुविधा कुठे मिळेल?
सरकारी आणि प्रायव्हेट व्हॅक्सीनेशन सेंटर्सवर वॉक-इनची सुविधा आहे. कोणतीही व्यक्ती आपला फोटो ओळखपत्र देऊन ऑन-द-स्पॉट रजिस्ट्रेशन करुन व्हॅक्सीन डोज घेऊन शकते. मात्र यासाठी तुम्हाला ज्या सेंटरवर जायचे आहे तिथली स्थिती जाणून घ्या.

जगातील इतर व्हॅक्सीनच्या तुलनेत कोवीसील्ड 2.5 ते 3.75 टक्के स्वस्त
कोवीशील्ड व्हक्सीन : 400 -600 रुपये
रशियन व्हॅक्सीन :750 रुपये
अमेरिकन व्हॅक्सीन : 1500
चायनीज व्हॅक्सीन : 750

सीरमने ठरवल्या किंमती
दुसरीकडे सीरम इंस्टीट्यूटने बुधवारी कोवीशील्ड व्हॅक्सीनचे नवीन रेट फिक्स केले होते. सीरमने सांगितले होते की, प्रायव्हेट रुग्णालयांना कोवीशील्ड व्हॅक्सीन 600 रुपयांमध्ये दिली जाईल. यापूर्वी या रुग्णालयांना ही व्हॅक्सीन 250 रुपयांमध्ये दिली जात होती. राज्यांसाठी व्हॅक्सीनच्या किंमती 400 रुपये असतील आणि केंद्राला पहिल्याप्रमाणे ही व्हॅक्सीन 250 रुपयांमध्ये मिळत राहील.

बातम्या आणखी आहेत...