आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CoWIN Vaccine Registration Slot Booking Update; New Feature Added By Government On Covid Vaccine Portal

आता कोविन पोर्टलवरच चुका सुधारता येतील:व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये नाव, जन्मतारीख आणि जेंडरसंबंधीत करेक्शन होऊ शकतील, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अॅडिशनल सेक्रेटरी विकाश शील यांनी बुधवारी ही माहिती दिली.

केंद्र सरकारने कोविन पोर्टलवर एक नवीन फीचर जोडले आहे. या माध्यमातून जर व्हॅक्सीन घेणाऱ्या व्यक्तीच्या व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये काही चुक झाली असेल, तर ती कोविन पोर्टलच्या माध्यमातूनच सुधारली जाऊ शकते. या माध्यमातून नाव, डेट ऑफ बर्थ किंवा जेंडरसंबंधीत चुका सुधारल्या जाऊ शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अॅडिशनल सेक्रेटरी विकाश शील यांनी बुधवारी ही माहिती दिली.

या स्टेप्सच्या माध्यमातून करता येईल करेक्शन

  1. सर्वात पहिले http://cowin.gov.in वर जावे लागेल.
  2. यानंतर व्हॅक्सीन घेणाऱ्या व्यक्तीला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन लॉग इन करावे लागेल.
  3. 'रेज एन इश्यू' च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  4. नाव, ईयर ऑफ बर्थ आणि जेंडरमध्ये करेक्शनचे ऑप्शन येईल. यावर टिक करुन करेक्शन केले जाऊ शकेल.

कोविन अॅपचे 5 मॉड्यूल
हे अॅप व्हॅक्सीनेशनची प्रोसेस, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह अॅक्टिव्हिटीज, लसीकरण कर्मचारी आणि अशा लोकांसाठी एक मंचाप्रमाणे काम करते, ज्यांना लस घ्यायची आहे. यामध्ये 5 मॉड्यूल देण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रशासनिक मॉड्यूल, रजिस्ट्रेशन मॉड्यूल, व्हॅक्सीनेशन मॉड्यूल, लाभान्वित स्वीकृती मॉड्यूल आणि रिपोर्ट मॉड्यूलचा समावेश आहे.

प्रशासनिक मॉड्यूल : ते लोक जे व्हॅक्सीनेशन इव्हेंटचे संचालन करतील. या मॉड्यूलच्या माध्यमातून ते सेशन ठरवू शकतात. ज्याच्या माध्यमातून लसी घेणाऱ्या लोकांना आणि प्रबंधकांना नोटिफिकेशनच्या माध्यमातून माहिती मिळेल.
रजिस्ट्रेशन मॉड्यूल : अशा लोकांसाठी असेल जे लसीकरण कार्यक्रमासाठी आपले रजिस्ट्रेशन करतील.
व्हॅक्सीनेशन मॉड्यूल : त्या लोकांच्या माहितीला व्हेरिफाय करेल, जे लस घेण्यासाठी आपले रजिस्ट्रेशन करतील. याविषयी स्टेटसही अपडेट केले जाईल.
लाभान्वित स्वीकृती मॉड्यूल : याच्या माध्यमातून लसीकरणाच्या लाभान्वित लोकांना मॅसेज पाठवले जातील. यामुळे क्यूआर कोडही जनरेट होईल आणि लोकांना व्हॅक्सीन घेण्याचे ई-सर्टिफिकेटही मिळेल.

रिपोर्ट मॉड्यूल
याच्या माध्यमातून लसीकरण कार्यक्रमासंबंधीत रिपोर्ट तयार होईल. जसे, लसीकरणाचे किती सेशन झाले, किती लोकांनी लस घेतली, किती लोकांनी रजिस्ट्रेशननंतरही लस घेतली नाही, इत्यादी.

देशात लसीकरणाची परिस्थिती
आतापर्यंत देशात कोरोना व्हॅक्सीनचे 23 कोटी 90 लाख 58 हजार 360 डोस घेण्यात आले आहेत. यामध्ये 99.95 लाख हेल्थ केअर वर्कर्सला पहिला डोस आणि 68.91 लाख लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच 1.63 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सला पहिला डोस आणि 87.26 लाख लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

देशात 18 ते 44 वर्षांच्या 3.17कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यामध्ये 3.16 लाख लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर 45 ते 60 वर्षांमधील 7.25 कोटी लोकांचा व्हॅक्सीनचा पहिला डोस झाला आहे. यामध्ये 1.15 कोटी लोकांनी व्हॅक्सीनचा दुसरा डोस घेतला आहे. सीनियर सिटीझन म्हणजेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 6.12 कोटी लोकांना कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला आहे. यामधून 1.94 कोटी लोकांनी व्हॅक्सीनचा दुसरा डोस घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...