आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मिशन 2024 साठी सी.आर. पाटील यांना भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी देणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात २३ जानेवारीला समाप्त होत आहे. लोकसभा निवडणूक २०२४ पर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवला जावा किंवा नवीन कार्यकारी अध्यक्ष करावा या विषयावर पक्षात विचार-विनिमय सुरू आहे. नड्डा यांना आणखी एक टर्म देण्याच्या बाजूने अनेक नेते नाहीत. दुसरीकडे गुजरात भाजपमध्ये मोठी भूमिका बजावलेल्या सी.आर.पाटील यांच्याकडे ही जबाबदारी देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये ऐतिहासिक यश मिळाले. मात्र, पाटील यांच्यावर नावाबाबत अडचण येऊ शकते. पंतप्रधान, गृहमंत्री व पक्षाध्यक्ष तीनही गुजरातचे होतील. २०१४ मध्ये असाचा प्रश्न उपस्थित झाला होता, जेव्हा पीएम आणि भाजपाध्यक्ष दोघेही एकाच राज्याचे होते. २०२४ ची निवडणूक महत्त्वाची असल्याने एकाच राज्यातील प्रमुख मुद्दा ठरत नाही.

बातम्या आणखी आहेत...