आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cracks Have Not Increased In The Area Where The Ground Has Been Eroded For A Week In Jaeshimath

सीबीआरआयच्या अहवालातील माहिती:जाेशीमठात आठवडाभरापासून जमीन खचलेल्या क्षेत्रात तडे वाढले नाहीत

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडच्या जोशीमठात भूस्खलन क्षेत्रात भिंतींना पडलेल्या तड्यांमध्ये आठवडाभरानंतरही वाढ झालेली नाही. केंद्रीय भवन संशोधन संस्थेच्या(सीबीआरआय) पथकाने १४ जानेवारीला नगर क्षेत्रातील प्रभावित क्षेत्राच्या सुमारे ५० इमारतींत क्रॅकोमीटर स्थापित केले होते. ही मशीन दरांची खोली आणि तीव्रता मोजण्याचे काम करते. सीबीआरआयच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, गेल्या एका आठवड्यात कोणत्याही क्रॅकोमीटरमध्ये तडे वाढल्याची नोंद नाही. दुसरीकडे, सरकारने लोकसभेत सांगितले की, नजीकच्या क्षेत्रात जलविद्युत प्रकल्प नाही. तपाेवन विष्णुगड हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टही भूस्खलन झालेल्या ठिकाणापासून दूर असल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...