आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indore Accident | Cranes Brake Failed Two Bikes Were Crush | 4 People Died In Accident 

क्रेनचे ब्रेक फेल, दुचाकी चिरडल्या:दोन सख्ख्या भावांसह 4 जण ठार; जखमी महिलेचे दोन्ही पाय निकामी

इंदूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूरच्या बाणगंगा पोलिस ठाण्याच्या परिसरात मंगळवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना झाली. पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलावर पाठीमागून आलेल्या क्रेनने दोन दुचाकीस्वारांना चिरडले. क्रेनचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन अल्पवयीन भावांसह चौघांचा मृत्यू झाला. तर एक 40 वर्षीय महिलेचा पाय मोडला. त्या महिलेस अरबिंदो रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी क्रेन चालकास अटक केली आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय देव शर्मा यांनी सांगितले की, क्रेनचे ब्रेक निकामी झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. टीआय राजेंद्र सोनी यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये क्रेन वेगात येणाऱ्या दोन्ही दुचाकींना चिरडताना दिसली आहे. अपघात झाल्यानंतर बाणगंगा पुलाच्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

मृतांमध्ये यांचा समावेश

मृतांमध्ये रितेश (16) आणि शरद (6) हे दोघे सख्खे भाऊ असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याची आई शारदा गंभीर जखमी आहे. त्यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. तर शारदा यांच्या बहिणीचा मुलगा राज (13) याचाही मृत्यू झाला आहे. शारदा यांच्या भावाच्या मुलीच्या लग्नासाठी सर्वजण रेवती या ठिकाणी आलेले होते. येथून सर्वजण आपापल्या गावी कालीदेवी (झाबुआ) व डबल चौकीकडे परतत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेनला धडकलेली दुसरी दुचाकी सुनील परमार यांचा मुलगा मदनलाल (40, रा. संगम नगर) याची आहे. सुनील हा पंचशील फार्मा कंपनीच्या एचआर विभागात काम करत होता आणि तेथून घरी परतत होता. त्यानंतर त्याचाही क्रेनची धडक बसून मृत्यू झाला.

अपघातस्थळावरील पाहा फोटो....

दुचाकीस्वारांना क्रेनखालून बाहेर काढताना स्थानिक लोक.
दुचाकीस्वारांना क्रेनखालून बाहेर काढताना स्थानिक लोक.
अपघातात दोन बाईकवरील 4 जणांचा मृत्यू झाला.
अपघातात दोन बाईकवरील 4 जणांचा मृत्यू झाला.
बसच्या धडकेत बाइकस्वार क्रेनच्या खाली गेला
बसच्या धडकेत बाइकस्वार क्रेनच्या खाली गेला
क्रेनच्या खाली आलेली दुचाकी.
क्रेनच्या खाली आलेली दुचाकी.