आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाझियाबादमध्ये मोठी दुर्घटना:स्मशानभूमीचे छत कोसळल्याने 21 जणांचा मृत्यू; ज्यांचा अंत्यसंस्कार होता, त्यांच्या मुलाचाही ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू

गाझियाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक पावसापासून बचावासाठी छताखाली जमले होते

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली. येथील मुरादनगरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान छत कोसळल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. यातील 21 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. ज्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार होता, या दुर्घटनेत त्याच्या मुलाचाही मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार मुरादनगरचे फळ व्यापारी जयराम यांचे निधन झाले होते. त्यांच्यावर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू होते. यादरम्यान सर्वजण येथे उपस्थित होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली. अडीच महिन्यांपूर्वीच स्मशानभूमीचे छत बांधले होते.

छत बांधताना निकृष्ट सामग्रीचा वापर केल्याचा लोकांचा आरोप आहे. घटनास्थळी उपस्थित जयराम यांचा नातू देवेंद्रने सांगितले की, माझ्या आजोबावर अंत्यसंस्कार सुरू होते. इतर लोक दूर उभे होते. यादरम्यान अचानक स्मशानभूमीचे छत कोसळले. येथे उपस्थित सर्व लोक त्याच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत त्यांच्या काकाचा देखील मृत्यू झाल्याचे देवेंद्रने सांगितले. एक चुकत भाऊ ढिगाऱ्याखाली दबलेला आहे. या घटनेत त्याचे वडीलही जखमी झाले आहेत.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 2 लाखांची मिळणार मदत

NDRF चे पथक बचावकार्य करत आहे. पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser