आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Crew Members Who Left Mumbai For Film On Vidyasagarji Get Rid Of Meat, Life Improves

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:विद्यासागरजींवर चित्रपटासाठी मुंबईहून गेलेल्या क्रू मेंबर्सचा मांसाहार सुटला, जीवनचर्याही सुधारली

काेटा / प्रवीण जैन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहिंसा आणि प्रेमाचा संदेश देणारे जैन संत आचार्य विद्यासागरजी यांच्यावर प्रथमच ‘अंतर्यात्री महापुरुष-द वाॅकिंग गाॅड’ हा चित्रपट तयार होत आहे. सदैव मुंबईच्या झगमगाटात वावरणाऱ्या या चित्रपटाचे क्रू मेंबर आचार्यश्रींच्या संपर्कात येऊन पूर्णपणे सात्त्विक बनले आहेत. चित्रपट संकलक गुल अन्सारी व कॅमेरामन नासिर खान यांनीही मांसाहार त्यागला आहे. शूटिंग सुरू होऊन सुमारे ६ महिने झाले आहेत.

अन्सारी म्हणाले, ‘चित्रपटासाठी काम सुरू केल्यापासून जीवनचर्या बदलली आहे. आधी सात्त्विक जेवण करत नव्हतो. आता डाळ, पोळी, सॅलड, कोशिंबीर हेच जेवण अधिक भावते.’ दिग्दर्शक अनिल कुलचेनिया म्हणाले, सात्त्विक आयुष्य जगणाऱ्या अभिनेत्यांचीच चित्रपटासाठी निवड केली आहे. महाभारतात युधिष्ठिर साकारणारे गजेंद्र चाैहान आचार्यश्रींच्या वडिलांची भूमिका करत आहेत.

अभिनेतेही फक्त सात्त्विक आयुष्य जगणारेच निवडले
दिग्दर्शक कुलचेनिया म्हणाले, पारखूनच अभिनेत्यांची निवड केली. कलाकारांची सत्यता समोर यावी म्हणून भूमिकांच्या निवडीआधी त्यांना मद्य व मांसाहारी पार्टीची ऑफर दिली. यानंतर सुमारे २०० कलाकारांची निवड केली. शूटिंगदरम्यान संपूर्ण क्रूचे जेवणही सात्त्विकच ठेवले. आचार्यश्रींची भूमिका विवेक मिश्रा साकारत आहेत. १५ जणांची विशेष टीम आचार्यश्रींच्या दिनचर्येनुसार अभिनेत्यांना त्यांच्या भूमिकेविषयी मार्गदर्शन करत असते.

बातम्या आणखी आहेत...