आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरण:भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोविड-19 ची लस, वैज्ञानिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शास्त्री यांनी व्हॅक्सीन घेत असतानाचा आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भारतीय क्रेकट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोविड-19 व्हॅक्सीनचा पहिला डोज घेतला आहे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. रवी शास्त्री यांनी ही व्हॅक्सीन अहमदाबादच्या अपोलो रुग्णालयात घेतली. कोच शास्त्री यांनी व्हॅक्सीन घेत असतानाचा आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये ते टीम इंडियाची जर्सी घालून बसलेले दिसत आहेत तर त्यांच्या शेजारी एक महिला नर्स पीपीई किट घालून त्यांना व्हॅक्सीन देताना दिसत आहे.

रवी शास्त्री यांनी ट्विट केले, 'कोविड-19 चा पहिला डोज घेतला. महामारीविरोधा भारताला सशक्त बनवण्यासाठी अद्भुत आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि वैज्ञानिकांचे आभार. अहमदाबादमध्ये कांताबेन आणि त्यांच्या अपोलोच्या टीमचे लसीकरणातील प्रोफेशनलिज्म पाहून प्रभावित झालो.'

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोना लस देण्यात आली आहे. आता खेळाडूंना लस कधी दिली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या भारतीय क्रिकेट टीम अहमदाबादमध्ये आहे. त्यांना इंग्लंडच्या विरोधात 4 मार्चपासून चार सामन्यांच्या मालिसा सामन्यांचा चौथा आणि अखेरचा सामना खेळायचा आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध याच स्टेडियममध्ये पाच सामन्यांची टी -20 मालिकादेखील खेळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...