आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Cricket Stadium To Be Built At 11000 Feet Height Near Atal Tunnel, 10,000 Spectators Will Be Able To Sit Together, Ground Fixed In Sissu; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील सर्वात उंच क्रिकेट स्टेडियम:अटल बोगद्याजवळील सिसूमध्ये बनवला जाणार स्टेडियम; 10 हजार प्रेक्षकांची क्षमता

हिमाचल22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजूबाजूच्या क्रिकेटपटूंना होणार फायदा

देशातील सर्वात उंच क्रिकेट स्टेडियम हे हिमाचल प्रदेशातील लाहौल स्प‍िती जिल्ह्यात बांधण्यात येणार आहे. हे स्टेडियम अटल बोगदा, रोहतांगपासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर असणार्‍या सिसूमध्ये बनवला जाईल. दरम्यान, हा स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 10 हजारांपर्यंत राहील. हे स्टेडियम देशातील सर्वात उंच स्टेडियम असणार असून याची लांबी समुद्रसपाटीपासून 11 हजार फूट उंचीवर असणार आहे. यापूर्वी देशातील सर्वात उंच स्टेडियम याच राज्यात असून ते सोलन जिल्ह्यात आहे. त्याची उंची 7 हजार 500 फूट आहे. या स्टेडियमचे निर्माण 1891 मध्ये महाराज भूपेंद्र सिंह यांनी केले होते.

38 बीघा मैदान फायनल

समुद्रसपाटीपासून 11 हजार फूट उंचीवर असणार्‍या या स्टेडियमच्या बांधकामासाठी 38 बीघा जमीन निवडण्यात आली आहे. जमीनीचे अधिग्रहण वन संरक्षण अधिनियम (एफसीए) कायद्याअंतर्गत करुन देहरादूनला मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. जेणेकरुन हे मैदान स्टेडियमसाठी हस्तांतरित होऊ शकेल आणि क्रिकेट बांधणीची प्रक्रिया सुरू होण्यास मदत होईल.

आजूबाजूच्या क्रिकेटपटूंना होणार फायदा
जिल्ह्यात स्टेडियम होण्यासाठी लाहौल स्पिती जिल्हा क्रिकेट संघ गेल्या सात वर्षांपासून धडपडत आहे. या स्टेडियमचा फायदा लाहौल-स्पीतीसह चंबाच्या पंगी किल्लाड, कुल्लू आणि मंडीमधील क्रिकेटपटूंना होणार आहे. लाहौल-स्पिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर यांचे म्हणणे आहे की, संबंधित फाईल वनविभागाला सादर केली गेली आहे. राज्य सरकारच्या शिफारशीनंतर एफसीएच्या मान्यतेसाठी फाइल देहरादूनला पाठविली जाणार असल्याचे ते म्हणाले.

हिवाळ्यात तापमान उणे 20 अंशांपेक्षा कमी होतो
हिवाळ्यात सिसूचे तापमान उणे 20 अंशांपर्यंत खाली जाते. उन्हाळ्यात ते साधारणत: 15 ते 20 अंश असते. दरम्यान, येथील हवामान क्रिकेटसाठी चांगले असून येथील हवामान सातही महिने अनुकूल असते. त्या आधारे जागेची निवड करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...