आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानावर रक्तपात:नो-बॉल दिल्यामुळे अंपायरची हत्या, ओडिशातील फ्रेंडली मॅचमध्ये घडली घटना; 4 आरोपींना अटक

कटक​​​​​​​2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 वर्षीय लकी राऊत नामक तरुण या सामन्यात अंपायरिंग करत होता.  - Divya Marathi
22 वर्षीय लकी राऊत नामक तरुण या सामन्यात अंपायरिंग करत होता. 

ओडिशाच्या कटक येथे रविवारी एका फ्रेंडली सामन्यात अंपायरची निर्घृण हत्या करण्यात आली. सामना खेळणाऱ्या खेळाडूंनी अंपायरिंग करणाऱ्या लकी राऊत नामक 22 वर्षीय तरुणाला बॅट व चाकूने भोसकून ठार मारले. लकीने एक बॉल नो बॉल घोषित केला होता. त्याला खेळाडूंनी विरोध दर्शवला. त्यानंतर वाद एवढा वाढला की, खेळाडूंनी थेट अंपायरिंग करणाऱ्या लकीवरच हल्ला चढवला.

या प्रकरणी चौद्वार पोलिसांनी स्मृतीरंजन राऊत, जगा राऊत, बादल कौबतल व संजय राऊत या 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

प्रथम जाणून घ्या काय आहे प्रकरण

चौद्वार अंतर्गत येणाऱ्या महिशिलांदामध्ये रविवारी दुपारी शंकरपूर व बेरहामपूरच्या अंडर-18 क्रिकेट संघांचा फ्रेंडली मॅच सुरू होता. अंपायरिंग महिशिलांदाचा लकी राऊत करत होता. दुपारी 12.30 च्या सुमारास अंपायर लकीने एक बॉल नो-बॉल घोषित केला. या चेंडूवरून लकी व जगा राऊत यांच्यात वाद झाला. त्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या दलीजोड संघाचे स्मृतीरंजन (मुन्ना) राऊतने लकीवर बॅट व चाकूने हल्ला केला.

लकीला गंभीर स्थितीत एससीबी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नातेवाईकांनी एका आरोपीला पकडले

रुग्णालयाबाहेर मृताचे नातेवाईक व गावकऱ्यांनी आरोपींच्या अटकेसाठी तीव्र निदर्शने केली.
रुग्णालयाबाहेर मृताचे नातेवाईक व गावकऱ्यांनी आरोपींच्या अटकेसाठी तीव्र निदर्शने केली.

कटकचे पोलिस उपायुक्त (DSP) पिनाक मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच चौद्वार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गदारोळ घालणाऱ्या लकीच्या कुटुंबीय व गावकऱ्यांनी पोलिसांना घेराव घातला. हे सर्वजण आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत होते. दुसरीकडे, काही लोकांनी एका आरोपीला अटक करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

दिव्य मराठीच्या खालील बातम्या वाचा...

भयावह:एका प्रवाशाने रेल्वेतच दुसऱ्याला पेटवले, 3 ठार, 9 जखमी; केरळमध्ये रेल्वेत चढण्यावरून दोघांत झाला होता वाद

केरळच्या कोझिकोडमध्ये रविवारी एक्सप्रेस रेल्वेत चढण्यावरून 2 प्रवाशांत वाद झाला. त्यानंतर एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत 3 प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झालेत. पोलिसांनी सांगितले की, मृतांत एका महिला व मुलासह पुरुषाचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह रात्री उशिरा इलाथूर रेल्वे स्थानकाच्या रुळावरून जप्त करण्यात आले.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात असून, त्याचा शोध सुरू आहे. मृतांत मत्तन्नूरच्या रहमत, त्याची बहीण व 2 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर जखमी प्रवाशांत थलासेरीच्या अनिल कुमरा, त्यांची पत्नी सजीशा, त्यांचा मुलगा अद्वैत व कन्नूरच्या रूबी व त्रिशूरच्या राजकुमार यांचा समावेश आहे. या सर्वांवर कोझिकोडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

भयंकर:बलात्कारानंतर मुलीच्या बॉडीचे 10 तुकडे, 8 वर्षीय चिमुरडी 4 दिवसांपासून होती बेपत्ता; निर्जनस्थळी आढळला मृतदेह

एका 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिच्या मृतदेहाचे निर्दयीपणे तब्बल 10 तुकडे करण्यात आल्याची खळबळजनक घटना राजस्थानात घडली आहे. ही मुलगी गत 4 दिवसांपासून बेपत्ता होती. घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावरील एका भग्न वाड्यात तिच्या मृतदेहाचे तुकडे पडल्याचे आढळले. उदयपूरच्या मावली भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी मृतदेह आढळल्यानंतर 24 तासांनी या घटनेचा खुलासा केला. या प्रकरणी एका तरुणाच्या बलात्कार व हत्येप्रकरणी मुसक्या आवळण्यात आल्यात. येथे वाचा संपूर्ण बातमी...