आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rishabh Pant Accident; Indian Cricketer Rishabh Pant Car Accident | Team India | Rishabh Pant

डुलकी लागल्याने ऋषभ पंतचा कार अपघात:लोक वाचवायला आले तेव्हा म्हणाला- मी ऋषभ पंत आहे; BCCI ने म्हटले - कपाळ, गुडघा आणि मनगटात दुखापत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

25 वर्षीय क्रिकेटपटू ऋषभ पंत शुक्रवारी सकाळी एका रस्ता अपघातात थोडक्यात बचावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपेमुळे हा अपघात झाला. त्याची मर्सिडीज नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली, त्यानंतर तिला आग लागली आणि ती उलटली. अपघातानंतर खिडकी तोडून पंत जळत्या कारमधून बाहेर पडला. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

हा अपघात पहाटे 5.30 वाजता रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर ढालच्या वळणावर झाला. तो स्वतःची कार क्रमांक DL 10 CN 1717 चालवत होता. डुलकी घेतल्यानंतर त्यांची मर्सिडीज अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. त्यावेळी कारचा वेग ताशी 150 किमी होता. कार 200 मीटरपर्यंत सरकत गेली.

त्याला रुरकीहून डेहराडूनला उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यांच्यावर येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास त्यांना विमानाने दिल्लीला नेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

BCCI ने सांगितले- कपाळावर दोन जखमा, गुडघ्याचा लिगामेंट तुटला
बोर्डाचे सचिव जय शहा म्हणाले, पंतच्या कपाळावर दोन जखमा आहेत. गुडघ्याचा लिगामेंट फाटला आहे. उजव्या हाताच्या मनगटावर आणि घोट्यालाही जखमा झाल्या होत्या. एमआरआयनंतर त्याच्या दुखापतीची तीव्रता कळेल. आम्ही वैद्यकीय पथक आणि त्यांच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहोत. या कठीण काळात आम्ही पंतला सर्व शक्य वैद्यकीय उपचार आणि मदत देऊ.

ऋषभ पंतवर प्लास्टिक सर्जरी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतच्या डोक्याला, पायाला, पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. अपघातामध्ये ऋषभ पंतच्या चेहऱ्याला, डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे ऋषभ पंतची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.

झोप आल्याने अपघात

उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत हा कारमध्ये एकट्यानेच प्रवास करत होता. पहाटे कार चालवताना ऋषभ पंतला झोप आली होती. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले.

पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले की, अपघातनंतर ऋषभ पंतच्या कारला आग लागली. त्यामुळे पंत जळत्या कारची खिडकी तोडून बाहेर आला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतची प्रकृती सध्या स्थिर आहे.

आईला सरप्राईज देण्यासाठी एकटाच घरी जात होता
पंत हाएकटेच घरी जात होता. आईला सरप्राईज देणार असल्याचे डॉ.सुशील नागर यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले - कार उलटल्यानंतर लागली आग
मोठा आवाज ऐकू आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. डिव्हायडरला धडकल्यानंतर एक कार काही फूट खेचल्याचे दिसले. ती उलटल्यानंतर आग पकडल्याचे दिसून आले. आम्ही त्याला उचलून दवाखान्यात नेले.

करिअर धोक्यात?

ऋषभ पंतवर उपचार करणारे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, त्यांच्या गुडघ्याचे कोणते हाड मोडले आहे हे एमआरआयनंतरच कळेल. त्यानंतरच ऋषभ पंत पुढे खेळू शकेल की नाही?, हे सांगता येईल.

PHOTOS आणि CCTV मध्ये पाहा केवढा भीषण होता अपघात...

पहिली कार 150 किमी/तास वेगाने दुभाजकाला धडकली...

हा CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक कार भरधाव वेगाने येताना दिसते, जी रेलिंगला धडकते. ही कार ऋषभ पंतची असल्याचे सांगितले जात आहे.
हा CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक कार भरधाव वेगाने येताना दिसते, जी रेलिंगला धडकते. ही कार ऋषभ पंतची असल्याचे सांगितले जात आहे.

कार धडकल्यानंतर आग लागली ...

अपघातानंतर कारने पेट घेतला. याचा हा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपघातानंतर कारने पेट घेतला. याचा हा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गावकऱ्यांनी सुटका करून रुग्णालयात दाखल केले...

कारमधून उतरल्यानंतर पंत रस्त्यावर जखमी अवस्थेत दिसला. गावकऱ्यांनी व रस्त्याने जाणाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्या चेहऱ्यावर रक्त स्पष्ट दिसत आहे.
कारमधून उतरल्यानंतर पंत रस्त्यावर जखमी अवस्थेत दिसला. गावकऱ्यांनी व रस्त्याने जाणाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्या चेहऱ्यावर रक्त स्पष्ट दिसत आहे.

डॉक्टर म्हणाले - जर सीट बेल्ट घातले असते तर गाडीत जास्त भाजले जाण्याची शक्यता
डॉ. सुशील नागर यांनी दिव्य मराठी सांगितले की, पंत याने सीट बेल्ट घातला नव्हता. त्यामुळे तो सुखरूप बाहेर आला. त्याने सीट बेल्ट लावला असता तर गाडीला आग लागल्यानंतर तो भाजला असता.

गाडीत लाखो रुपये होते, लोक मदत करण्याऐवजी लोक खिशात ठेवत होते.
ऋषभच्या कारमध्ये सुमारे तीन ते चार लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर सर्व रक्कम रस्त्यावर विखुरली होती. त्याला तिथे त्रास होत होता पण यावेळी काही लोक ऋषभला मदत करण्याऐवजी खिशात नोटा भरण्यात आणि व्हिडिओ बनवण्यात मग्न झाले.

अपघातानंतर कारला आग लागली.
अपघातानंतर कारला आग लागली.
आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली.
आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली.
अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे.
अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे.
कार रेलिंगला धडकल्याने जवळपास 5 फूट हवेत उडाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कार रेलिंगला धडकल्याने जवळपास 5 फूट हवेत उडाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघातानंतर ऋषभ पंतला तातडीने उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आले आहे.
अपघातानंतर ऋषभ पंतला तातडीने उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...