आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे (आरसीए) अध्यक्ष वैभव गहलोत यांच्यासह 14 जणांविरुद्ध महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. वैभव गहलोत यांनी महाराष्ट्राच्या पर्यटन विभागातील ई-टॉयलेटसह अन्य शासकीय विभागांमध्ये निविदा काढण्याच्या नावाखाली 6. 80 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप नाशिकचे व्यापारी सुशील भालचंद्र पाटील यांनी केला आहे.
सुशील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वैभव गहलोतसह १४ जणांविरुद्ध १७ मार्च रोजी नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित आरोपी गुजरात काँग्रेसचे सचिव सचिन पुरुषोत्तम वालेरा आहे. सचिन यांचे वडील पुरुषोत्तम भाई वालेरा हेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिले आहेत.
गुजरात काँग्रेस सचिवांनीही केला आरोप
सुशील पाटील यांच्या एफआयआरनुसार, सचिन वालेरा स्वत:ला जाहिरात व्यावसायिक आहेत व त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे १३ राज्यांतील पेट्रोल पंपांवर जाहिरात करण्याचे कंत्राट आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाशी आपले चांगले संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे आर्थिक व्यवहार पाहत असल्याचा दावाही त्यांनी केला.
काही महिन्यांपासून मी पंजाबमध्ये काम करायला सुरुवात केली असून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना ओबी व्हॅन भेट दिली आहे, असेही ते म्हणाले. सचिन वालेरा यांनी आपल्या कामात गुंतवणुकीवर करोडोंच्या नफ्याचे आश्वासन दिले आणि केवळ नावापुरतेच टेंडरमध्ये सहभागी व्हावे लागेल, असे सांगितले. वैभव गेहलोत हे उर्वरित काम पाहतील. सचिन वालेरा यांनी या गुंतवणुकीची सर्व माहिती दिली. राजस्थान सरकारने जारी केलेली परिपत्रके दाखवली, जी नंतर बनावट असल्याचे आढळून आले.
वैभव गहलोतांवर जुगार खेळल्याचा आरोप
नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्यात वैभव गहलोतांसह १४ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, सचिन वालेरा यांनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या वेळी पैसे हस्तांतरीत केले. ही रक्कम सुमारे 6 कोटी 80 लाख रुपये होती. त्यावेळी सचिन वालेरा आणि वैभव गेहलोत यांनी अनेक महिन्यांपासून गुंतवणुकीवरील मासिक परतावा बँक खात्यात वर्ग केला होता. हे पाहता आणखी अनेक भागीदारांनीही गुंतवणूक केली. सचिन आणि वैभवने अचानक मासिक देयके देणे बंद केल्याचा आरोप आहे. एफआयआरमध्ये वैभव गहलोतांवर जुगार खेळल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने आरोप केला की, वैभव गहलोत हे 20-20 क्रिकेट सामन्यांसाठी जुगार खेळतात आणि ते त्यांच्या मासिक परताव्यावर खर्च करतात. दरम्यान, सचिन यांनी पैसे भरण्यासाठी वेळ मागितला. नंतर त्यांनी पैसे मागितल्यावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने फोन उचलणेही बंद केले असेही तक्रारदाराचे म्हणणे आहे.
तक्रारदाराने न्यायालयात घेतली धाव
सचिन वालेरा यांनी दाखवलेली पर्यटन विभागाची निविदा कागदपत्रे तपासणीत बनावट असल्याचे आढळून आले. ई-टॉयलेटसाठी निविदा काढल्या नाहीत. नंतर पैसे न मिळाल्याने आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने नाशिकच्या न्यायालयात धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याला दिले आहेत.
हे आहेत संशयित
सचिन भाई पुरुषोत्तमभाई वालेरा, वैभव गहलोत, किशन कँटेलिया, सरदार सिंग चौहान, प्रवीण सिंग चौहान, सुहास सुरेंद्रभाई मकवाल, निवभाई महेशभाई वीरमाभट, विश्वरंजन मोहंती, राजबीर सिंग शेखावत, प्रग्नेश कुमार विनोदचंद्र प्रकाश, संजय कुमार देसाई, संजय कुमार देसाई. पारनेर, ऋषिता शहा आणि विराज गंवाल यांना आरोपी करण्यात आले आहे. बनावट निविदा कागदपत्रे दाखवून पैसे चोरण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
गुन्हा दाखल होताच राजकारण तापले
एफआयआरमध्ये वैभव गेहलोतचे नाव आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरुद्धच्या एफआयआरमधील सत्य समोर आणून मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
माझा याच्याशी काहीही संबंध नाही, आरोप खोटे - वैभव गेहलोत यांचे ट्विट
वैभव गेहलोत यांनी फसवणुकीच्या एफआयआरवर ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. वैभव गेहलोत यांनी कोणतीही माहिती दिली नसून आरोप फेटाळून लावले आहेत. वैभव यांनी लिहिले की, माध्यमांत ज्याप्रकारे चर्चा सुरू आहे, त्यात माझे नावही टाकण्यात आले आहे. मला याबद्दल काहीही माहिती नाही आणि माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे खोटे आरोप, हेराफेरीच्या गोष्टी समोर येतील हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.