आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Criminal Case Against 42% Minister, New Minister Of State For Home Nishith Pramanik Accused Of Murder; News And Live Updates

केंद्र सरकारचे कलंकित मंत्रिमंडळ:42% मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी खटले, नवीन गृह राज्यमंत्री निशीथ प्रमाणिक तर चक्क हत्येचे आरोपी; ADR च्या अहवालात खुलासा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 टक्के मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता 8 ते 12 वी

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त मंत्र्यांवर खून आणि खूनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. यातील अनेक मंत्र्यांजवळ कोट्यवधीची संपत्ती आहे. नॅशनल इलेक्शन वॉच आणि एडीआरच्या नवीन अहवालात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

मोदी सरकारमधील 42 टक्के मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल आहेत. मंत्रिमंडळातील 78 पैकी 33 जणांनी तशी माहिती दाखल केलेली आहे. पश्चिम बंगालमधील खासदार व गृह राज्यमंत्री निशीथ प्रमाणिक यांनी आपल्याविरुद्ध हत्येसंबंधी खटला सुरू असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय जॉन बारला, पंकज चौधरी व व्ही. मुरलीधरन या मंत्र्यांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत.

नवीन गृहमंत्र्यांवर हत्येचा आरोप
निशीथ प्रामाणिक हे मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात कमी वयाचे मंत्री आहेत. प्रामाणिक हे पश्चिम बंगालमधून खासदार असून आता गृहराज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला आहे. निशीथ प्रामाणिक हे 35 वर्षाचे असून त्यांचे शिक्षण 8 वी पर्यंत झाले आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हेगारी खटला दाखल आहे.

15 टक्के मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता 8 ते 12 वी
मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील 15 टक्के म्हणजेच 12 मंत्र्यांचे शिक्षण हे 8 ते 12 वी दरम्यान झालेले आहे. तर दुसरीकडे 64 मंत्र्यांनी आपले शिक्षण पदवी व त्यापेक्षा अधिक दाखवलेले आहे. यातील दोन मंत्र्यांने आपली शैक्षणिक पात्रता डिप्लोमा दाखवले आहे.

बातम्या आणखी आहेत...