आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रयागराजच्या पाच प्रख्यात शाळांतील २०० विद्यार्थ्यांनी टोळ्या स्थापन केल्या आहेत. ‘तांडव’, ‘माया’ आणि ‘अमर’ नावाच्या या टोळ्या अनेक गुन्ह्यांत सहभागी आहेत. पोलिसांनी गुरुवारी धक्कादायक खुलासा करत सांगितले की, गेल्या काही दिवसांत देशी बॉम्बचे अनेक स्फोट याच विद्यार्थ्यांच्या टोळ्यांनी घडवले होते. पोलिस या विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत.
पोलिसांनी मंगळवारी १० अल्पवयीन विद्यार्थ्यांसह ११ जणांना ताब्यात घेतले होते. ते वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या १५, १६ आणि २२ जुलैच्या देशी बॉम्बस्फोटांच्या घटनांत सहभागी होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अनेक दुचाकी, एक डझन सेलफोन आणि काही देशी बॉम्ब जप्त केले आहेत. एसएसपी शैलेश पांडे यांनी सांगितले की, ‘हे विद्यार्थी परस्परांवर हल्ले करत होते आणि देशी बॉम्बही फेकत होते. आरोपी दुचाकी वाहनांवर फिरत असत आणि नेहमी आपला चेहरा झाकून घेत असत.’
धमकी देण्यासाठी सोशल मीडियावर बनवले पेज
या विद्यार्थ्यांनी टोळीसाठी सोशल मीडिया पेजही बनवले आहे. त्यावर ते दुसऱ्या टोळीवरील आपले वर्चस्व दाखवण्यासाठी बॉम्ब स्फोटांची छायाचित्रे पोस्ट करतात. जे या टोळ्यांत सहभागी होऊ शकतात अशा विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत. सुरुवातीला देशी बॉम्बच्या स्फोटांत गुन्हेगारी टोळ्या सहभागी असाव्यात, असा संशय पोलिसांना होता, पण मोबाइल फोनच्या निगराणीतून विद्यार्थी पकडले गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.