आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Criminal Has Gone, But What About Those Protecting Him: Priyanka On Vikas Dubey's Encounter Killing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:गँग्सटर तर गेला आता त्याला संरक्षण देणाऱ्यांचे काय? विकास दुबे एनकाउंटरनंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींचा सवाल

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकासला गुरुवारी अटक केली तेव्हा प्रियंकांनी उत्तर प्रदेश सरकारवर ठपका ठेवला होता

गँगस्टर तर गेला आता त्याला प्रोटेक्शन देणाऱ्या लोकांचे काय? असा सवाल काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी उपस्थित केला आहे. कानपूरमध्ये 8 पोलिसांचा मारेकरी विकास दुबेला एनकाउंटरमध्ये ठार मारण्यात आले. त्यावर प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना ही प्रतिक्रिया दिली आहे. उज्जैन येथून कानपूरला नेले जात असताना शुक्रवारी सकाळी पावसामुळे पोलिसांचे वाहन उलटले. याच दरम्यान दुबेने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला एनकाउंटरमध्ये ठार मारण्यात आले. या अपघातात 4 पोलिस कर्मचारी आणि नवाबगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जखमी झाले अशी माहिती कानपूरचे पोलिस महासंचालक मोहित अग्रवाल यांनी दिली.

हिंदीत ट्विट करताना काँग्रेस नेत्या प्रियंका म्हणाल्या, गुन्हेगार तर गेला. पण, त्याचे गुन्हे आणि त्याला संरक्षण देणाऱ्यांचे काय? कानपूरमध्ये पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दुबेला गुरुवारी सकाळी उज्जैन येथील महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती. त्यावेळी दुबेला कथित संरक्षण देणाऱ्यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी असे प्रियंका म्हणाल्या होत्या. सोबतच, उत्तर प्रदेशातील भाजप सरकार या प्रकरणात पूर्णपणे अपयशी ठरले असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणात काही लागेबांधे असल्याचे आरोप सुद्धा प्रियंका यांनी यापूर्वी केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser