आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांवर हल्ला:चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गावकऱ्यांची बेदम मारहाण; एसआयचा मृत्यू तर कॉन्सटेबल जखमी

कौशांबीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ल्यात मृत्यूमूखी पडलेले एसआय कृष्ण राय सिंह - Divya Marathi
हल्ल्यात मृत्यूमूखी पडलेले एसआय कृष्ण राय सिंह

उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात कानपूरच्या बिकरु गावासारखी घटना घडली आहे. बुधवारी रात्री चोरोला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ग्रामीणांना बेदम मारहाण केली. या घटनेत एसआयचा मृत्यू झाला तर एक कॉन्स्टेबल जखमी झाला. यावेळी एसआयची सरकारी पिस्तुलही हिसकाऊन घेण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर रासुका लावण्याची तयारी आहे.

ग्रामीणांनी घेरुन दोघांना बेशुद्ध होईपर्यंत मारले

प्रकरण सैनी ठाणे क्षेत्रातील नरसिंगपुर कछुआ गावातील आहे. कड़ा धाम पोलिस स्टेशनचे एसआय कृष्ण राय सिंह आणि कॉन्सटेबल दिलीप यादव बुधवारी रात्री चोरीतील आरोपी सिंटूला पकडण्यासाठी आले. यामुळे नाराज झालेल्या आरोपींच्या कुटुंबियांनी गावकऱ्यांसोबत मिळून दोघांवर लाठ्या-काठ्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेहोते. गुरुवारी एसआय कृष्ण राय सिंह यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...