आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Crisis On Breath And Death In 6 States, Things Are Terrible In The Second Wave Of Corona; No Place In Crematoriums, Lack Of Oxygen, Yet Negligence ... See These Pictures

कोरोनाशी जीवन मरणाचा लढा, 6 राज्यांचे चित्र:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती भयंकर; स्मशानात जागा नाही, ऑक्सिजनची कमतरता, तरीही निष्काळजीपणा

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्सिजन सिलेंडरसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना सगळीकडे फिरावे लागत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाच्या अनेक राज्यांमध्ये परिस्थिती एवढी भयंकर झाली आहे की, स्मशानभूमी आणि कब्रिस्तानमध्येही जागा कमी पडत आहे. रुग्णालयांमध्ये बेड रिकामे नाही, ऑक्सीजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. ऑक्सीजनच्या कमतरता आणि योग्य उपचार मिळू न शकल्याने अनेक राज्यांमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे. ऑक्सिजन सिलेंडरसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना सगळीकडे फिरावे लागत आहे. या 6 राज्यांची भयंकर परिस्थिती...

गुजरात : 15 दिवसात 14.40 लाख किलो लाकडांनी जाळल्या चिता

कोरोना पॉझिटिव्ह14 दिवसांच्या नवजात शिशुचा सूरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. 11 दिवसांच्या उपचारानंतरही तो वाचू शकला नाही, अशा लहान मुलाचा येथे मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे. येथे गुजरातमधील सूरत अहमदाबाद, राजकोट आणि वडोदरासारख्या शहरांमध्ये दररोज सुमारे 600 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामध्ये सुमारे 96 हजार किलो लाकूड वापरण्यात येत आहे. 15 दिवसांत 14.40 लाख किलो लाकूड जाळले गेले.

मध्यप्रदेश : माझा रुग्ण, माझे ऑक्सिजन... मागणी 100 टन, मिळत आहेत 70, उर्वरित नातेवाईकांच्या जबाबदारीवर

मध्य प्रदेशातील इंदूरच्या मेदांता रुग्णालयात सुमारे 12 दिवसांपासून एका 77 वर्षीय महिलेला दाखल करण्यात आले आहे, आतापर्यंत कुटुंबीयांनी 10 सिलिंडर आणले आहेत. बुधवारीसुद्धा कर्मचार्‍यांनी सांगितले की, ऑक्सीजनची कमतरता आहे, त्यामुळे आता कुटुंबांना ऑक्सीजनची व्यवस्था करणे अवघड झाले आहे, हे लक्षात घेता या महिलेला आज रात्री विमानाने हलवून जयपूर येथे हलवले जाऊ शकते. दुसरीकडे शहरातील रुग्णालयांमध्ये दररोज 100 टन ऑक्सीजनची मागणी केली जात आहे, परंतु त्यांना सुमारे 70 टन ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे.

राजस्थान : पहाडगंज मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार, एक PPE किट शिवाय सामिल

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 26 हजारांच्या पुढे गेली आहे. येथे अवघ्या 18 दिवसात दोन हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतरही दुर्लक्ष दिसून आले. अंतिम संस्कार करण्यासाठी पहाडगंज मोक्षधाम येथे एक कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह आणला गेला, त्यादरम्यान एक व्यक्ती PPE किटशिवाय दिसली.

हरियाणा : 4 तासांनंतर चिता पाणी टाकून शांत केली, कारण दुसऱ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता यावेत

हरियाणाच्या रोहतक येथील स्मशानभूमीत दोन शिफ्टमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. PGIमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात 8 जणांचा मृत्यू झाला. कोविड-प्रोटोकॉलमुळे संस्कारांसाठी रुग्णवाहिकेत 4-4 मृतदेह नेण्यात आले. जागा कमी असल्यामुळे त्यांच्यावर 2 शिफ्टमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 4 मृतदेहांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या 4 तासानंतर, उर्वरित मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी तयारीसाठी पाणी शिंपडुन चिता थंड करण्यात आली.

छत्तीसगढ : मृतदेहांच्या गर्दीमुळे प्लॅटफॉर्म फूल, यामुळे जमिनीवर अंत्यसंस्कार

छत्तीसगडच्या रायपूर येथील महादेव घाटाच्या स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जागा नव्हती, त्यामुळे अंत्यसंस्कार खाली केले गेले. गेल्या तीन दिवसांत येथे 20 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

झारखंड : घाघरामध्ये मृतदेह येण्यापूर्वीच तयार होते चिता, 22 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार

झारखंडच्या रांचीमध्ये रोज 20 पेक्षा जास्त कोरोना संक्रमित मृतदेह जाळले जात आहेत. परिस्थिती अशी आहे की, येथे मृतदेह येण्यापूर्वीच चिता तयार केली जात आहे. सामुहिकरित्या अंत्यसंस्कार केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...