आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन राज्यांत राज्यसभेच्या १६ जागांसाठी शुक्रवारी मतदान पूर्ण झाले. राजस्थानच्या चार जागांपैकी काँग्रेसने तीन आणि भाजपने एक जागा जिंकली. भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभव पत्करावा लागला. भाजप आमदार शोभाराणी यांनी काँग्रेसच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले. निवडणुकीनंतर भाजपने एक तर काँग्रेसने दोन मते रद्द करण्याची मागणी केली, पण निवडणूक अधिकाऱ्यांनी ती मान्य केली नाही. दुसरीकडे, हरियाणात मतमोजणी रात्री उशिरापर्यंत थांबलेली होती.राजस्थानमध्ये भाजपचे घनश्याम तिवारींना ४३ मते, काँग्रेसचे रणदीप सुरजेवालांना ४३, मुकुल वासनिक यांना ४२ आणि प्रमोद तिवारींना ४१ मते मिळाली. क्रॉस व्होटिंगद्वारे विजयाची अपेक्षा करणाऱ्या सुभाष चंद्रांच्या पदरात निराशाच पडली. निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष एकजूट दिसला, तर भाजपमधील मतभेद स्पष्टपणे दिसले. विशेष म्हणजे राज्यसभेसाठी १५ राज्यांच्या ५७ जागांपैकी ४१ जागांवर उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले.
हरियाणा : भाजप-काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव : हरियाणात सत्तारूढ भाजपने काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपले मत दाखवल्याने त्यांचे मत रद्द करण्याची मागणी केली. चंदीगडमध्ये निवडणूक अधिकाऱ्याने व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर भाजपने मागणी रद्द केली. त्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांनी भाजपवर जाणूनबुजून मतमोजणी रोखल्याचा आरोप केला. काँग्रेसनेही आयोगाकडे मतमोजणीची मागणी केली आहे. राजस्थानात भाजप आमदाराचे क्रॉस व्होटिंग; काँग्रेसला ३, भाजपला १ मते रद्द करण्याची मागणी केली, पण निवडणूक अधिकाऱ्यांनी ती मान्य केली नाही. दुसरीकडे, हरियाणात मतमोजणी रात्री उशिरापर्यंत थांबलेली होती.
राजस्थानमध्ये भाजपचे घनश्याम तिवारींना ४३ मते, काँग्रेसचे रणदीप सुरजेवालांना ४३, मुकुल वासनिक यांना ४२ आणि प्रमोद तिवारींना ४१ मते मिळाली. क्रॉस व्होटिंगद्वारे विजयाची अपेक्षा करणाऱ्या सुभाष चंद्रांच्या पदरात निराशाच पडली. निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष एकजूट दिसला, तर भाजपमधील मतभेद स्पष्टपणे दिसले. विशेष म्हणजे राज्यसभेसाठी १५ राज्यांच्या ५७ जागांपैकी ४१ जागांवर उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले.
हरियाणा : भाजप-काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव : हरियाणात सत्तारूढ भाजपने काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपले मत दाखवल्याने त्यांचे मत रद्द करण्याची मागणी केली. चंदीगडमध्ये निवडणूक अधिकाऱ्याने व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर भाजपने मागणी रद्द केली. त्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.
दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांनी भाजपवर जाणूनबुजून मतमोजणी रोखल्याचा आरोप केला. काँग्रेसनेही आयोगाकडे मतमोजणीची मागणी केली आहे.
कर्नाटकमधील ४ जागांपैकी ३ जागा भाजपने तर काँग्रेसने एक जागा जिंकली. जेडीएसचे खाते उघडू शकले नाही. ४ जागांसाठी सहा उमेदवार होते. जेडीएसच्या एका आमदाराने काँग्रेसच्या आणि एकाने भाजपच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले. भाजपतर्फे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, जग्गेश आणि लहरसिंह सिरोया विजयी झाले. काँग्रेसचे जयराम रमेश यांनाही विजय मिळाला.
५७ पैकी १८ जागा भाजपला, ८ काँग्रेसला
१५ राज्यांच्या ५७ जागांची निवडणूक प्रक्रिया मेमध्येे सुरू झाली. ११ राज्यांतील ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. चार राज्यांच्या १६ जागांसाठी १६ जूनला मतदान झाले. हरियाणाच्या दोन जागांवर मतमोजणी रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.
पक्ष जागा
भाजप १८
काँग्रेस ८
वायएसआर ४
द्रमुक ३
बीजेडी ३
आप २
राजद २
टीआरएस २
अद्रमुक २
झामुमो १
जेडीयू १
सपा १
रालोद १
अपक्ष १
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.