आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांग्लादेशातील कट्टरपंथियांनी पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर चढवला आहे. येथील २०० हून अधिक जणांच्या एका जमावाने गुरुवारी राजधानी ढाक्यातील इस्कॉन राधाकांता मंदिरावर हल्ला करुन प्रचंड तोडफोड व लूटमार केली. त्यात ३ भाविक जखमी झालेत. हल्लेखोरांचे नेतृत्व हाजी शफीउल्लाह करत होता. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात घबराट पसरली आहे.
इस्कॉन प्रमुखांचा संयुक्त राष्ट्राला सवाल -आता मौन का?
इस्कॉन इंडियाचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी एका ट्विटद्वारे डोल यात्रा व होळी समारंभाच्या पूर्वसंध्येला झालेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्र हजारो असहाय्य बांग्लादेशी व पाकिस्तानी अल्पसंख्यकांच्या वेदनांवर शांत असल्याचे पाहूने आश्चर्य वाटते. एवढ्या मोठ्या हिंदू अल्पसंख्यकांनी आपले प्राण व संपत्ती गमावली. पण, त्यानंतरही संयुक्त राष्ट्राचे मौन सुटत नाही.
द काश्मीर फाईल्सने हिंदूंना जागे केले, पुन्हा झोपू नका
राधारमण दास म्हणाले, काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्राने इस्लामोफोबियाचा निपटारा करण्यासाठी 15 मार्च हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पारित केला. आश्चर्य म्हणजे हाच संयुक्त राष्ट्र हजारो असहाय्य बांग्लादेशी व पाकिस्तानी अल्पसंख्यकांच्या वेदनांवर मौन बाळगत आहे. द काश्मीर फाईल्सने हिंदूंना जागे केले असून, आता कुणीही झोपू नका, असेही ते यावेळी म्हणाले.
शिवसेनेने म्हटले लज्जास्पद घटना
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी बांग्लादेशातील हिंदू अल्पसंख्यक व त्यांच्या प्रार्थना स्थळांप्रती वाढणारी असहिष्णुता लज्जास्पद असल्याची टीका केली आहे. त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयालाही हे प्रकरण मजबुतीने बांग्लादेशापुढे मांडण्याचे आवाहन केले आहे.
गतवर्षीही झाला होता हल्ला
गतवर्षी दुर्गा पूजेच्यावेळी चांदपूर जिल्ह्यात जमावाने हिंदू मंदिरावर हल्ला केला होता. त्यात ३ जणांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बांग्लादेश हिंदू यूनिटी काउंसिलने पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे हिंदूंना सुरक्षा उपलब्ध करवून मागणी केली होती.
बांग्लादेशात यापूर्वीही झालेत हिंदू मंदिरांवर हल्ले
बांग्लादेशातील हिंदू अल्पसंख्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा इतिहास खूप जूना आहे. भारतातील बाबरी मशिदीच्या विध्वंसापूर्वीच 29 ऑक्टोबर 1990 रोजी जमात ए इस्लामी नामक संघटनेने बांग्लादेशात बाबरी मशिद पाडल्याची अफवा पसरवली होती. यामुळे 30 ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर १९९० पर्यंत तिथे मोठा हिंसाचार झाला होता. त्यात अनेक हिंदू मारले गेले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.