आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी ग्राउंड रिपोर्ट:मंत्र्यास हटवण्यासाठी लखीमपूरमध्ये संयुक्त शेतकरी माेर्चाच्या वतीने धरणे आंदाेलन

एम. रियाज हाश्मी । लखीमपूर खिरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरीमध्ये संयुक्त शेतकरी माेर्चाच्या धरणे आंदाेलनात दुसऱ्या दिवशी गर्दी वाढल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांना पदावरून हटवण्यासह इतर मागण्यांबाबत ७५ तासांचे धरणे सुरू आहेत. या भागात एक वर्षापूर्वी तीन कृषी कायद्यांविराेधात शेतकऱ्यांनी आंदाेलन केले हाेते. मंडीत पहिल्या दिवशी एका छताखाली शेतकरी आंदाेलनासाठी बसलेले हाेते. परंतु शुक्रवारी तीन शेडमध्ये इतर राज्यांतील शेतकऱ्यांचीही गर्दी झाली हाेती.

या परिसरात शेतकरी मिळेल तेथे आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिय्या मांडून हाेते. अनेक ठिकाणी लंगरचीदेखील व्यवस्था आहे. तिकुनिया हिंसाचार प्रकरणात अटकेतील शेतकऱ्यांची एसकेएमच्या १० नेत्यांनी भेट घेतली. राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली ही नेतेमंडळी तेथे पाेहाेचली हाेती. तत्पूर्वी या नेत्यांनी सुमारे दाेन तास पुढील रणनीतीवर मंथन केले. गेल्या वर्षी ३ ऑक्टाेबर राेजी तिकुनियामध्ये उपमुख्यमंत्री केशवप्रसाद माैर्य यांच्या आगमनादरम्यान निदर्शने करणाऱ्यांवर गाेळीबार केला होता.

बातम्या आणखी आहेत...