आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Crowd । Tourist Places । Shimla, Surat, Prayagraj, Manali । Covid 19 Third Wave; News And Live Updates

10 फोटोंमध्ये पहा पर्यटन स्थळांवरील गर्दी:पंतप्रधान मोदींच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत पर्यटकांनी केली गर्दी; शिमला आणि चंदीगडला पोहोचले हजारो पर्यटक, नोएडामध्ये लांबचलांब रांगा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगडच्या सुखना तलावावर पर्यटकांची गर्दी. दर रविवारी येथे असेच दृश्य पहायला मिळते. - Divya Marathi
चंदीगडच्या सुखना तलावावर पर्यटकांची गर्दी. दर रविवारी येथे असेच दृश्य पहायला मिळते.
  • मुख्यमंत्र्यांनी दिले होते कडक कारवाई करण्याचे निर्देश

देशातील कोरोनाच्या आकडेवारीत गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहे. यामुळे देशातील काही राज्यांत निर्बंध थोडे शिथील करण्यात आले आहे. परंतु, येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार संबंधित राज्यांना तयारीत राहण्यासाठी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील पर्यटन स्थळांवर होत असलेल्या गर्दीविषयी चिंता व्यक्त केली होती.

लोकांनी पंतप्रधानांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करत पर्यटन स्थळांवर गर्दी करायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशातील शिमला आणि अन्य ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून चालानदेखील कापले जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले होते कडक कारवाई करण्याचे निर्देश
एका आठवड्यापूर्वी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरदेखील दुसऱ्या राज्यातून पर्यटनासाठी लोक येत आहे. हिमाचल प्रदेशावितिरिक्त गुजरात, झारखंड, तेलंगाना आणि पंजाब राज्यांतदेखील मोठ्या लोक गर्दी करत आहे.

शिमलाच्या मॉल रोड आणि रिजमध्ये शनिवार व रविवार रोजी प्रचंड गर्दी दिसून येत आहे. येथे जास्तीत जास्त लोक विना मास्क फिरताना आढळत आहे.
शिमलाच्या मॉल रोड आणि रिजमध्ये शनिवार व रविवार रोजी प्रचंड गर्दी दिसून येत आहे. येथे जास्तीत जास्त लोक विना मास्क फिरताना आढळत आहे.
हिमाचल प्रदेशच्या शिमला, मनालीसारख्या शहरांमध्ये अनेक राज्यातील लोक येत आहे.
हिमाचल प्रदेशच्या शिमला, मनालीसारख्या शहरांमध्ये अनेक राज्यातील लोक येत आहे.
फोटो प्रयागराजचा आहे. येथे अष्टमीला गंगा नदीत स्नान करून लोक बोटीची सफर करतात.
फोटो प्रयागराजचा आहे. येथे अष्टमीला गंगा नदीत स्नान करून लोक बोटीची सफर करतात.
फोटो सूरतमधील ताप्ती नदीच्या काठावरील आहे. येथे एक व्यक्ती त्याच्या वाढदिवशी आपल्या कुटुंबासमवेत नौकाविहार करण्यास आला होता.
फोटो सूरतमधील ताप्ती नदीच्या काठावरील आहे. येथे एक व्यक्ती त्याच्या वाढदिवशी आपल्या कुटुंबासमवेत नौकाविहार करण्यास आला होता.
हैदराबादमधील सय्यद शाह युसुफुद्दीनच्या दर्गा येथे दूरदूरहून येणार्‍या लोकांचा क्रम सुरु आहे.
हैदराबादमधील सय्यद शाह युसुफुद्दीनच्या दर्गा येथे दूरदूरहून येणार्‍या लोकांचा क्रम सुरु आहे.
रविवारी नोएडामध्ये कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या होत्या.
रविवारी नोएडामध्ये कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या होत्या.
मुंबईत तीन दिवसापासून पाऊस सुरु असल्याने लोक आज फिरण्यासाठी बाहेर पडले.
मुंबईत तीन दिवसापासून पाऊस सुरु असल्याने लोक आज फिरण्यासाठी बाहेर पडले.
फोटो तिरुअनंतपुरमचा आहे. येथील धरणातून पाणी सोडण्यात असून याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
फोटो तिरुअनंतपुरमचा आहे. येथील धरणातून पाणी सोडण्यात असून याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
पंजाबमधील सिरसामध्ये शेतकऱ्यांनी बराच काळ रास्तारोको आंदोलन केले.
पंजाबमधील सिरसामध्ये शेतकऱ्यांनी बराच काळ रास्तारोको आंदोलन केले.
बातम्या आणखी आहेत...