आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड स्थित कार्यालयावर शुक्रवारी दुपारी एका जमावाने हल्ला केला. काँग्रेसने या घटनेमागे स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा (SFI)हात असल्याचा आरोप केला आहे. पक्षाने एसएफआयच्या गुंडांनी पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचाही आरोप केला आहे.
राहुल यांच्या कार्यालयातील तोडफोडीचा एक व्हिडिओही उजेडात आला आहे. त्यात शुक्रवारी दुपारी काही जण कार्यालयाच्या खिडक्यांवर चढून मोडतोड करताना दिसून येत आहेत. त्यांच्या हातात एसएफआयचे झेंडेही दिसून येत होते. त्यांनी नारेबाजी करुन सामानाचीही मोडतोड केली.
काँग्रेस म्हणाली -हल्ल्यासाठी केरळचे CM जबाबदार
काँग्रेसने राहुल यांच्या कार्यालयावरील हल्ल्यासाठी केरळच्या मुख्यमंत्र्याना जबाबदार धरले आहे. केरळमध्ये सर्वत्र अराजक माजले आहे. मुख्यमंत्री अशा दंगेखोरांना राजाश्रय का देत आहेत, असे युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी म्हटले आहे.
केरळ काँग्रेसचे नेते व आमदार टी. सिद्दीकी यांनीही राहुल यांच्या कार्यालयावरील हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी राज्यातील बिघडत्या कायदा सुव्यवस्थेसह मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हल्लेखोरांना सोडणार नाही -विजयन
केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी राहुल गांधींच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले -देशात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण, कुणीही आपली मर्यादा सोडू नये. राज्यात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार अमान्य असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
राहुल यांनी सुप्रीम कोर्टाच्या फैसल्यावर मौन बाळगल्याने जनतेत नाराजी
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच संरक्षित क्षेत्रर, वन्यजीव अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानालगतच्या 1 किमी क्षेत्राला पर्यावरण-संवदेनशील क्षेत्र (ESZ)क्षेत्र घोषित केले आहे. राहुल यांनी या निर्णयावर मौन बाळगले आहे. यावर स्थानिक जनता त्यांच्यावर नाराज आहे.
राहुल यांनी वायनाड व अमेठीतून एकत्र निवडणूक लढवली
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. ते अमेठीत भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले. तर वायनाडमधून विजयी झाले. वायनाड लोकसभा मतदार संघ भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. हा भाग केरळ, कर्नाटक व तामिळनाडूच्या सीमांना जोडणारा आहे. त्यामुळे या जागेवरील पराभव व विजयाचा परिणाम तिन्ही राज्यांच्या सीमाभागावर होतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.