आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील तुघलक रोड भागात असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) संचालकांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या CRPFच्या एका अधिकाऱ्याने स्वतःवर AK47रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली. ASI राजबीर कुमार (53) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना गेल्या शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. सद्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, ASI राजबीर कुमार यांनी त्यांच्या सर्व्हिस रायफल AK47 मधून स्वत:वर दोन गोळ्या झाडल्या. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुमार हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर होते आणि शुक्रवारीच ते ड्युटीवर परतले होते.
याप्रकरणाची चौकशी सुरू
पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून कलम 174 अंतर्गत तपास सुरू करण्यात आला आहे. आता मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.
कुटुंबीयांना माहिती दिली
पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून कलम 174 अंतर्गत तपास सुरू करण्यात आला आहे. आता मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेला गेला आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.
गोळीचा आवाज ऐताच धावाधाव
गोळीचा आवाज ऐकताच बंगल्याच्या मुख्य गेटकडे अन्य सीआरपीएफ जवानांनी धावाधाव केली. तेव्हा राजबीर कुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून बोटांचे ठसे मिळवण्यासाठी जिल्हा फॉरेन्सिक क्राईम टीमला पाचारण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.