आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CRPF Patrol In Handwara Attacked By Terrorists, Three Soldiers Martyred One Terrorist Killed

श्रीनगर:सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला; 3 जवान शहीद आणि 7 जखमी, 1 दहशतवादी ठार

हंदवाडा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 दिवसांपूर्वी हंदवाडामध्ये झालेल्या एनकाउंटरमध्ये कर्नल आणि मेजरसह 5 जवान शहीद झाले होते

हंदवाडाच्या काजीबाद परिसरात सोमवारी सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. सुरक्षादलाने या हल्ल्याचे प्रत्युतर देताना एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले, पण यादरम्यान 3 जवान शहीद झाले आहेत तर 7 जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर सीआरपीएफने परिसराला सील केले आहे. सध्या सर्वत्र सर्च ऑपरेशन सुरू आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या बाहेरील नौगामच्या वागूरा परिसरात सीआयएसएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केला. यादरम्यान सीआयएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. सुरक्षादलाने या परिसराला सील केले आहे.

कमांडिंग ऑफिसरसह 5 जवान शहीद

हंदवाडामध्येच शनिवारी रात्री झालेल्या एनकाउंटरमध्ये 21 राष्ट्रीय रायफल्स (आरआर) चे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मासह 5 जवान शहीद झाले. या चकमकीत भारतीय सेनेने दोन दहशतवाद्यांना ठार केले. यातील एक लश्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर हैदर होता. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्तर काश्मीरच्या एका घरात सुरक्षादलाने हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी या घरातील लोकांना बंधक बनवले होते. त्यांनाच वाचवण्यासाठी जवान गेले होते.

5 वर्षानंतर दहशतवादी चकमकीत कमांडिंग ऑफिसर शहीद

भारतीय सेनेने जम्मू-काश्मीरमध्ये पाच वर्षानंतर दहशतवादी चकमकीत कमांडिंग ऑफिसर गमावला आहे. यापूर्वी 2015 मध्ये कुपवाडाच्या हाजीनाका जंगलमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. ते महाराष्ट्राचे रहिवासी होते. कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वातीने 2017 मध्ये सेना जॉइन केली होती.

यासोबतच 27 जानेवारी 2015 ला 42 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एमएन राय काश्मीरच्या त्रालमध्ये झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. कर्नल राय गोरखा रेजिमेंटचे होते. त्यांना मरणोत्तर शौर्य चक्रने सन्मानित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...