आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Crude Oil 43% Cheaper; Petrol Prices Did Not Even Drop By Five Percent, To $79.61 Barrel Of Crude Oil

तेलाचे गणित:कच्चे तेल 43 टक्के स्वस्त, पेट्रोलचे दर पाच टक्क्यांनीही घटले नाहीत; 79.61 डॉलर/बॅरल झाले क्रूड ऑईल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कच्च्या तेलाचे (क्रूड) दर शुक्रवारी पुन्हा गडगडले. आता अांतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ७९.६१ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. ही पातळी यापूर्वी २८ सप्टेंबर २०२१ रोजी होती. याच वर्षी ७ मार्चला कच्च्या तेलाचे दर १३९.१३ डॉलर/बॅरलपर्यंत पोहोचले होते. यानुसार कच्चे तेल आतापर्यंत ४२.८% स्वस्त झाले आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर ५% ही घटले नाहीत. सप्टेंबरमध्ये दिल्लीत पेट्रोल १०१ रु. लीटर होते, आता ९७ रुपये आहे. वस्तुत: पुरवठ्याबाबत अनिश्चितता कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी कमी आहे. यामुळे दरांवर परिणाम झाला आहे.

यामुळे कमी होत आहेत तेलाचे दर

  • मागणीची चिंता : युरोप, अमेरिकेसारख्या विकसित देशांनी महागाईमुळे व्याजदर वाढवले. यामुळे कच्च्या तेलाची मागणी घटण्याची शक्यता आहे.
  • चीनमध्ये अनिश्चितता : चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर संसर्ग वाढीची शक्यता आहे. यामुळे कच्च्या तेलाची मागणी घटण्याची चर्चा आहे.
  • रशियात उत्पादन सामान्य: पाश्चात्त्य देशांनी रशियन तेलासाठी ६० डॉलर/बॅरल दराने मूल्य मर्यादा ठरवली. पण, रशियन तेल निर्यात बाधित होण्याची शक्यता नाही. तिथे उत्पादन सामान्य झाले आहे.

दर स्वस्ताईचा कुणावर व काय परिणाम

ग्राहकांसाठी.... तज्ज्ञांनुसार, सध्या पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. सरकारही पेट्रोलियमवरील कर कमी करण्याच्या मूडमध्ये नाही. कंपन्यांसाठी...: कच्च्या तेलाची आयात स्वस्त. यामुळे नफा वाढेल. उत्पादन शुल्क घटवल्यास उत्पादनाचे दर कमी होतील किंवा होणार नाहीत. अर्थव्यवस्थेसाठी... पहिल्या सहामाहीत आयात बिल ७६% वाढून ७.४७ लाख कोटी झाले. क्रूड स्वस्ताईने आयात बिल कमी होईल. डॉलरची मागणी कमी होईल.

बातम्या आणखी आहेत...