आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Crude Oil | Marathi News | After Seven And A Half Years, Crude Oil Again Crossed 100; Fears Of A Russian Invasion Of Ukraine Have Pushed Up Crude Oil Prices

युक्रेन VS रशिया:साडेसात वर्षांनंतर कच्चे तेल पुन्हा 100 डॉलर्सच्याही पार; युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या भीतीमुळे वाढू लागले क्रुड ऑइलचे दर

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युक्रेन : भारताने विमान संख्येची मर्यादा हटवली, अनेक देशांची नागरिक बाहेर काढण्यास सुरुवात
  • 3 सप्टेंबर 2014 ला इतके होते ब्रेंट क्रूडचे दर ​​​​​​​

सीमेवर रशियन लष्कराची जमवाजमव व युद्धाची शक्यता असतानाच जगातील अनेक देश युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढत आहेत. अनेक देशांनी युक्रेनच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या घटवली असून नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. दरम्यान, भारतानेही आपल्या नागरिकांना युक्रेनचा प्रवास टाळण्याचा व तेथून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. युक्रेनमध्ये भारतीयांना विमान तिकीट मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाने भारत आणि युक्रेनदरम्यानची उड्डाणे व जागांच्या संख्येवरील मर्यादा हटवली. मंत्रालयाने भारतीय विमान कंपन्यांना उड्डाणांची संख्या वाढवण्यास सांगितले आहे. मंत्रालय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयासोबत काम करत आहे. देशात पेट्रोलचे दर अशा पद्धतीने वाढले

युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यावरून सुरू असलेली अनिश्चितता आणि लाइट स्वीट क्रूडची मागणी कायम राहिल्याने कच्च्या तेलाच्या तेजीचा कल दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे दर बुधवारी ३.१४ डॉलरने (३.२२%) वाढून १००.७९५ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहेत.

हे ७ वर्षे ५ महिन्यांतील सर्वात महाग दर आहेत. तरीही ४ महिन्यांपासून इंधन दरवाढ झालेली नाही. ११ जुलै २००८ ला ब्रेंट क्रूडने विक्रमी १४७.०२ डॉलर प्रतिबॅरलची पातळी गाठली होती. विश्लेषकांनुसार, मार्चमध्ये यूपीसह ५ राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल दरवाढ होऊ शकते. डेलॉय टच तोहमात्सू इंडियाचे भागीदार देबाशिष मिश्रा हे नुकतेच म्हणाले होते की, १० मार्चला निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या दरांत लिटरमागे ८ ते ९ रुपयांची दरवाढ करू शकतात.

कालावधी क्रूड ऑइल पेट्रोल
(वर्ष/महिना) (डॉलर/बॅरल) (रुपये/लिटर)
2008 135-147 51
2012-14 100-120 64-69

युद्ध झाल्यास भारत आम्हास सहकार्य करेल : अमेरिका

वॉशिंग्टन | अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता प्राइस म्हणाले, क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या अलीकडच्या बैठकीत रशिया व युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या मुद्द्यावर राजनयिक-शांततापूर्ण तोडगा काढण्याची गरज आहे. यामुळे युद्ध झाल्यास भारताच्या मदतीची अमेरिकेला आशा आहे.

१ डॉलर वाढला तर ४० पैसे/लि. दरवाढ
जुलै २००८ च्या १५४ डॉलरच्या तुलनेत १०० डॉलर प्रतिबॅरलच्या हिशेबाने कच्च्या तेलाची भारतीय बास्केट सर्वात महाग झाली आहे. रुपयाच्या विनिमय दरातील घसरण याचे सर्वात मोठे कारण आहे. यामुळे रुपयात ब्रेंटची किंमत त्याच्या ऐतिहासिक पातळीच्याही वर गेली आहे. कच्च्या तेलाचे दर एका डॉलरने वाढले की भारतात पेट्रोल-डिझेलचे दर ४० पैशांनी महाग होतात.

बातम्या आणखी आहेत...