आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या हातात आईचा मृतदेह:तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटल्यानंतर DRG जवान लोकांना वाचवत होता, त्याच्या  हातात स्वतःच्या आईचाच मृतदेह आला

दंतेवाडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी एका तलावात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून चार जणांचा मृत्यू झाला. या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. DRG ची टीम बचावकार्यात गुंतलेली असताना, एका जवानाच्या हातामध्ये स्वतःच्या आईचा मृतदेह आला. या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये त्याची स्वतःची आई असल्याचे त्याला माहितही नव्हते.

अपघातावेळी सर्चिंगवर होते डीआरजीचे जवान
असे सांगितले जात आहे की, अपघाताच्या वेळी, DRG (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह ग्रुप) चे जवान तेलम-टेटम परिसरात सर्चिंगवर निघाले होते. तेव्हा त्यांना लोकांचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू आला. ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात बुडालेली दिसून आली. लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी मारली. यामध्येचा जवान वसू कवासी याचाही समावेश होता.

आईचा चेहरा पाहून मोठमोठ्याने रडू लागला जवान
एक एक करून या जवानांनी लोकांना बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले. नंतर त्यांनी पाहिले की ट्रॉली पाण्यात उलटी पडलेली आहे. म्हणून त्याच्याखालील लोकांनाही शोधायला सुरुवात केली. वसुच्या हातात एका महिलेचा मृतदेह आला. त्याने तो बाहेर काढला आणि आईचा चेहरा बघताच तो मोठमोठ्याने रडू लागला. ते शरीर त्याच्या स्वतःच्या आई फुके कवासी यांचे होते. सहकारी जवानांनी त्याला कसे तरी सांभाळले.

19 लोक जखमी, 5 जणांची प्रकृती गंभीर
फुके कवासी या काटेकल्याण ब्लॉकमधील टेटम येथील रहिवासी होत्या. आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या या गावातील 25-30 लोकांसह हिरानारला जात होत्या. फुके कवासी व्यतिरिक्त, 9 वर्षीय दिनेश मरकम, 16 वर्षीय दसाई कवासी आणि 35 वर्षीय कोसा माडवी यांचाही अपघातात मृत्यू झाला. 19 लोक जखमी आहेत. यातील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे.

बातम्या आणखी आहेत...