आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी रिसर्च:सीएसईचा अहवाल - 2020 मध्ये 5579 शेतकरी आत्महत्या, 2019 मध्ये 5957 होत्या, राजस्थानात एकही नाही

भोपाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निवास -
देशातील २५% लोकसंख्या आरोग्य, शिक्षण व जीवनशैलीच्या निकषांवर गरीब आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंटच्या अहवालानुसार, बिहार राज्यात सर्वाधिक ५१.९१% गरीब आहेत.

१६ शहरांमधील प्रत्येक चौथी व्यक्ती झोपडीत राहते. यात ६ राजधान्या आहेत. रायपूर आणि हैदराबाद तर मुंबईपेक्षाही वाईट आहे. केंद्र सरकारचे उद्दिष्ट : २०३० पर्यंत कोणीही झोपडीत राहू नये.

भोपाळसह ६ राजधान्यांत २५% लोकसंख्या झोपडपट्ट्यांत राहण्यास भाग

लिंग गुणोत्तर -राजधान्यांत रायपूर मागे, १००० पुरुषांमागे केवळ ७१५ स्त्रिया
२६ शहरांमध्ये ९०० पेक्षा कमी महिला, यात ९ राजधान्यांचा समावेश

राजधानी महिला रायपूर 715 लखनऊ 768 बंगळुरू 806 इंफाळ 821 भोपाळ 829 शिलाँग 839 गंगटोक 849 डेहराडून 861 पणजी 884 पाटणा 900 जयपूर 902

चिंता; रुग्णालयांत ५०% प्रसूती सिझेरियनद्वारे
-खासगी रुग्णालयांत होणाऱ्या सुमारे ५०% प्रसूती सिझेरियनद्वारे होत आहेत. ओडिशात त्या सर्वाधिक ७०% पर्यंत होत आहेत.
-२०१५-१६ तेे २०१९-२१ दरम्यान अ‍ॅनिमियाने पीडित महिलांची संख्या ३% वाढली. छत्तीसगडमध्ये सर्वाधिक १३% वाढ.
-२०१९-२१ च्या अहवालानुसार, लठ्ठपणा वाढणाऱ्या पुरुषांच्या (२३%) तुलनेत महिला (२४%) अधिक आहेत.
-कॅन्सरच्या १३.३२ लाख रुग्णांत ४७% हिस्सेदारी महिलांची आहे. कॅन्सर पीडितांत ४८.७% पुरुष आणि १६.५% महिला तंबाखूचे सेवन केल्याने या आजाराच्या तावडीत सापडले.

सीएसईच्या अहवालानुसार, राजधान्यांमध्ये सर्वात चांगली स्थिती चेन्नईची आहे. येथे १४४३ चे प्रमाण आहे. विशाखापट्टणममध्ये दर हजार पुरुषांमागे देशात सर्वाधिक १९९७ महिला आहेत. १६ शहरांमध्ये प्रतिहजार पुरुषांमागे १००० वर महिला आहेत. औरंगाबादमध्ये केवळ ४८५ असून ते देशात सर्वात कमी. केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे की २०३० पर्यंत लिंग गुणोत्तर १००% झाले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...