आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता:भात, कडधान्ये, तेलबियांची लागवड घटली; भाव वाढतील

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी आतापर्यंत तेलबियांसह खरीप पिकांची पेरणी गेल्या वर्षापेक्षा १.३ टक्के कमी झाली. भात आणि कडधान्य पिकांची लागवड दीर्घकालीन सरासरीपेक्षाही कमी झाली. त्यामुळे तांदूळ, डाळी आणि खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. बँक ऑफ बडोदाच्या अहवालात म्हटले की, या वेळी तांदूळ उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. २ सप्टेंबरपर्यंत भाताचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत ५.६ कमी होते. आता त्यात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. भरड तृणधान्यांची पेरणी गतवर्षीच्या तुलनेत निश्चितच चांगली झाली आहे, परंतु ती सामान्यपेक्षा कमी राहू शकते. २०२१ च्या तुलनेत कडधान्याखालील क्षेत्रदेखील ४.४% ने कमी आहे.

धानाचे क्षेत्र, कडधान्ये सामान्यपेक्षा कमी

पिक सामान्य गेल्या वर्ष कमी/ वर्षे जास्त भात 397.1 406.9 384 -5.6% भरड धान्य 183.6 171.6 179 +4.3% डाळी 140.2 135.5 129.6 -4.4% तेलबियां 184.1 189.7 188.5 -0.6% उ‌स 47.4 54.7 55.7 1.8% कापूस 125.6 117.7 125.7 +6.8% सर्व 1085 1083 1069 -1.3% (आंकडे लाख हेक्टेअमध्ये, स्रोत: बँक ऑफ बडोदा)

बातम्या आणखी आहेत...