आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Curb The Growing Population Imbalance In The Country; In The Coming Winter Session, The Bill, The Draft Is Almost Complete

मोठे पाऊल:देशात लोकसंख्येच्या वाढत्या असंतुलनावर अंकुश; येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक, मसुदा जवळपास पूर्ण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसंख्या संतुलन विधेयक आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्याचा ड्राफ्ट रिपोर्ट तयार झाला आहे. कायदा मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवताच जनतेची मते घेऊन तो सार्वजनिक करण्यात येणार आहे.

सूत्रांनुसार, लोकसंख्या संतुलन विधेयक-२०२२ देशभरातील लोकसंख्येचे असंतुलन दूर करण्यासाठी सादर केले जाणार आहे. अनेक राज्यात गेल्या काही वर्षांत लोकसंख्येच्या असंतुलनामुळे अनेक प्रकारची आव्हाने उभी राहिली आहेत. खासकरून आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असणाऱ्या प्रदेशात ही समस्या वेगाने वाढत आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणांनुसार, सीमा राज्यांत मुस्लिम लोकसंख्या १० वर्षांत ३० टक्क्यांहून जास्त वाढली आहे. तर सर्वसामान्य लोकसंख्या १०-१२ टक्के वाढली आहे. त्यामुळे पूर्वोत्तरमध्ये काही राज्यांत मूळ निवासींची ओळख धोक्यात आली आहे. सोबत राष्ट्रीय सुरक्षेची अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत.

रोजगाराच्या संधी आणि सांस्कृतिक ओळखीसाठी हे असंतुलन आव्हान बनले आहे. हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच केंद्र सरकारला त्यावर कायदा करण्याची गरज वाटत आहे. घुसखोरी, धर्मांतर आणि कोणत्याही एका ठिकाणी लोकसंख्येच्या दाट जाळ्यामुळे असंतुलनाची स्थिती तयार झाली आहे. देशातील बहुतांश राज्यात हे लोकसंख्येचे असंतुलन पाहायला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...