आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Curly's Club Linked To Sonali Phogat Murder Case Will Be Demolished, Latest News And Update

सोनाली फोगाट हत्याकांडाशी सबंधित कर्लीज क्लब पाडण्यात येणार:NGT कडून मिळाला नाही दिलासा; सुधीरच्या कोठडीत वाढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणाच्या भाजप नेत्या व टिक-टॉक स्टार सोनाली फोगाट हत्याकांडाप्रकरणी चर्चेत आलेले गोव्यातील कर्लीज क्लब लवकरच पाडण्यात येणार आहे. एनजीटीने क्लब मालकांनी गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीच्या निर्णयाविरोदात दाखल केलेली आव्हान याचिका धूडकावून लावली आहे. त्यामुळे हा क्लब लवकरच पाडण्यात येईल असा दावा केला जात आहे.

दुसरीकडे, गोवा पोलिसांनी सोनालीच्या हत्येनंतर या क्लबल टाळे ठोकले आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी सुधीर सांगवान व सुखविंदर यांना 2 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर विश्वास व्यक्त केला आहे.

कर्लीज क्लब पाडण्याची प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश एनजीटीने दिलेत. एनजीटीने विद्युत व पाणी पुरवठा विभागाला कर्लीज क्लबचा वीज-पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिलेत. तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनाही कर्लीज क्लबचा बारचा परवाना रद्द करण्याची सूचना करण्यात आली आहे. अंजुमा पंचायतीलाही यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. एनजीटीने या सर्वांना 15 दिवसांच्या आत आपल्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिलेत.

गोव्याच्या कर्लीज क्लबमध्ये 23 ऑगस्ट रोजी सकाळी सोनाली फोगाट आपला पीए सुधीर सांगवान व त्याचा मित्र सुखविंदर याच्यासोबत दिसून आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. गोव्याच्या अंजुना भागात बांधण्यात आलेला हा क्लब आता पाडण्यात येईल. गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने हा क्लब अवैध घोषित करून 21 जुलै 2016 रोजी तो पाडण्याचे आदेश जारी केले होते. तेव्हापासून हे प्रकरण सुरू आहे. हॉटेलच्या मालकांनी एनजीटीमध्ये आव्हान याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना ती फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे हा क्लब पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुधीर, सुखविंदरला 2 दिवसांची कोठडी

गोवा पोलिसांनी गुरुवारी सोनाली फोगाट हत्येप्रकरणी पीए सुधीर सांगवान व सुखविंदर यांना गुरुवारी पुन्हा कोर्टात सादर केले. तिथे त्यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी कर्लीज क्लबला टाळे ठोकले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही याची पुष्टी केली आहे.

सोनालीचा 23 ऑगस्ट रोजी झाला होता मृत्यू

सोनाली फोगाट यांचा मृत्यू 23 ऑगस्ट रोजी गोव्यात झाला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा पीए सुधीर व मित्र सुखविंदर होता. गोवा पोलिसांनी सोनालीचा भाऊ रिंकू यांच्या तक्रारीच्या आधारावर सुधीर व सुखविंदर यांच्याविरोधात हत्येचा व एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तर क्लब संचालक एडविन नुनिस, दत्ता प्रसाद व रमाकात मासुपा यांच्याविरोधातही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनालीच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...