आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Customers From Maharashtra, Petrol From Gujarat; Run Across The Border With A Saving Of Money

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:ग्राहक महाराष्ट्राचे, पेट्राेल गुजरातचे; 10 रुपयांच्या बचतीमुळे सीमापार धाव

उच्छल (गुजरात) / नीलेश पाटील6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील पंपावर 200 लिटरची विक्री, गुजरातमध्ये मात्र 4 हजारांचा उठाव

पोलिस हेड कॉन्स्टेबल श्याम पेंढारे व आश्रमशाळा शिक्षक तुषार काकुस्ते दोघांची ड्यूटी आहे महाराष्ट्रात, पण ते पेट्रोल भरण्यासाठी सीमा पार करून आले होते गुजरातच्या उच्छल पेट्रोल पंपावर. या पंपावर एक बोर्डच आहे - “महाराष्ट्र से पेट्रोल १० रुपये सस्ता! कृपया अपनी गाडी की टंकी यहां पर फुल करा लीजिए.’ कारण, महाराष्ट्रात पेट्रोलचा दर आहे ९६ रुपये ५ पैसे तर गुजरातेत ८६ रुपये ५५ पैसे. यामुळे गुजरातच्या पंपावर दिवसाला ४ हजार लिटरची विक्री होते. ३ किमीवरील महाराष्ट्रातील पेट्रोल पंपावर दिवसाला २०० रुपयांचीही विक्री होत नाही.

अवघा महाराष्ट्र पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने हैराण असताना नंदुरबार सीमेवरील नागरिक मात्र पेेट्रोलसाठी गुजरातेत जात आहेत. गुजरातपेेक्षा महाराष्ट्रात डिझेल दहा पैशांनी स्वस्त आहे, पण महाराष्ट्रापेक्षा गुजरातेत पेट्रोल १० रुपयांनी स्वस्त आहे. साहजिकच आठवड्याला १० लिटर पेट्रोल लागणारे काकुस्तेंसारखे शिक्षक असोत वा तपासणी नाक्यांवर ड्यूटीसाठी जाणारे पेंढारे असोत, शंभरेक रुपयांची बचत होते म्हणून गुजरातेत पेट्रोलसाठी येतात. उच्छल पेट्रोल पंप राज्याच्या सीमेपासून ३ किमीवर आहे. त्यामुळे तळोदा, अक्कलकुआ, नंदुरबारचे वाहनचालक या पंपावर गर्दी करत आहेत. धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर हा पंप आहे. पंपाच्या मालकानेही या फरकाचा फायदा घेत हिंदीतून याचा प्रचार करत शक्कल लढवत आपली अनोखी जाहिरात केली आहे की इथेच टाकी फुल करा, गुजरात राज्यातील हा शेवटचा पेट्रोल पंप आहे! परिणामी महामार्गावरील दूर पल्ल्याच्या वाहनांचे चालक येथे थांबतातच, शिवाय नवापूरची मंडळी चार पेट्रोल पंप टाळून तीन किलोमीटर पलीकडे जाऊन गुजरातमध्ये पेट्रोल भरतात.

पेट्रोलसाठी वन नेशन वन टॅक्स का नाही?
महाराष्ट्रात पेट्रोलवर व्हॅट दर गुजरात राज्यापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर २६ % तर गुजरात राज्यातील पेट्रोलवर १७ % व्हॅट घेतला जातो. भारतात “वन नेशन वन टॅक्स” ची अंमलबजावणी कधी होईल आणि इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात पेट्रोलचे दर कधी कमी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या तफावतीचा फटका अर्थातच सीमेवरील महाराष्ट्रातील पेट्रोल पंपधारकांना बसल्याची नाराजी नवापूरचे पंपचालक मनीष अग्रवाल यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

दोन्ही राज्यांतील अशी आहे तफावत
पेट्रोल

नवापूर (महाराष्ट्र) ९६.०५ रु.
उच्छल (गुजरात) ८६.५५ रु.

डिझेल
(महाराष्ट्र) ८५.५९ रु.
(गुजरात) ८५.६९ रु.