आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेमात पडलेल्या एका तरुणाने फेसबुकवर LIVE करत स्व:ताचा गळा चिरल्याची घटना घडली आहे. त्याची प्रकृती गंभीर असून ही घटना हैदराबादमध्ये घडली आहे. संबंधित तरुणाचे नाव शैलेश असुन तो उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील रहिवासी आहे. याची माहिती मिळताच कुटुंबीय हैदराबादला रवाना झाले.
शैलेशचे 30 नोव्हेंबर रोजी खलीलाबाद येथे राहणाऱ्या मुलीशी लग्न होणार होते. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. यानंतर तरुणाने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
मित्रांना शेवटचा सलाम
फेसबुक लाईव्हमध्ये शैलेश हा एका खोलीत बसलेला दिसतो आहे. संबंधित मुलीला तो आपल्या वेदना सांगताना दिसतोय. शेवटी त्याने आपल्या मित्रांना शेवटचा सलाम केला आणि गॅलेंडरने आपला गळा चिरला. गळा चिरल्याने रक्त वाहत होते. फेसबुक लाइव्ह 2.51 सेकंदांनंतर थांबले.
व्हिडिओमध्ये शैलेश 2 मिनिटे बोलला. तो म्हणाला की....
'भावांनो, मी तिचा फोटो आणि नंबर फेसबुकवर टाकलाय. जसे माझे झाले नाही, तसे तिचे लग्न होऊ देऊ नका ही तुम्हाला विनंती आहे. आता कधीच भेट होणार नाही.
हा काही खेळ नव्हता, मी प्रेम केले होते. गेल्या मंगळवारपासून आठवडा झाला आहे. पूर्वी बोलणे व्हायचे. आज सकाळी फोन करून तीने शिवीगाळ केली. सोबत असतास तर विष देऊन तुला मारले असते, असे म्हणाली. तर मग आता मी स्वतः मरणार आहे. प्रत्येकाने हे शेअर करावे जेणेकरून तिचेही लग्नही होणार नाही.
यानंतर शैलेशने स्व:ताचा गळा चिरला....
प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात दाखल
गावातील काही लोकांनी शैलेशला फेसबुकवर LIVE पाहिल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी हैदराबादमधील त्यांच्या ओळखीच्या लोकांना ही माहिती दिली आणि त्यांनी शैलेशला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे. शैलेश बचावला तरी त्याला बोलणे कठीण होईल, असे डॉक्टर सांगत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मुलीबद्दल फेसबुकवर पोस्ट
25 ऑक्टोबरला भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाची शैलेशची फेसबुकवर पोस्ट आहे. त्यानंतर, त्याने मुलीच्या धोक्याबद्दल पोस्ट देखील केली होती. त्याने फेसबुकवर नंबरसह तिचा फोटो शेअर केला होता. यावरूनच तो नैराश्यात असल्याचे लक्षात येते.
एक दिवसापूर्वी रेल्वे रुळावर गेला होता
सोमवारी शैलेश दुपारी रेल्वे रुळावरही पोहोचला होता. तेथे त्यांने फेसबुक लाईव्ह केले होते. मात्र, काही कारणास्तव लाईव्ह बंद केले. तो आत्महत्या करण्यासाठी तेथे गेला असावा, असे गावातील लोकांनी सांगितले. पण त्याने आपला विचार बदलला असावा. शैलशच्या हातावर मुलीच्या नावाचा टॅटूही आहे.
मुलीसोबत लग्न ठरले होते
शैलेशचा लहान भाऊ कमलेश म्हणाला, आम्ही कुटुंबात तीन भाऊ आहोत. मोठे भैय्या विमलेश यावेळी हैदराबादला गेले आहेत. शैलेश आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीमध्ये काय झाले हे आम्हाला माहीत नाही. सध्या आम्ही त्याच्या उपचारासाठी लागणार्या पैशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.