आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसच्या बैठकीत गोंधळ:नेत्यांच्या एका गटाला वाटत होते तात्काळ निवडणुका घ्याव्यात, पक्षाने ठरवले - नवीन अध्यक्ष जूनमध्ये निवडला जाईल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॉंग्रेसच्या एका गटाची मागणी - अध्यक्ष पूर्णवेळ आणि सक्रिय असायला पाहिजे

काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कलहादरम्यान शुक्रवारी पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक झाली. मीटिंगमध्ये ठरले की, पक्षाचा नवा अध्यक्ष जूनमध्ये निवडला जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा निर्णय होण्यापूर्वी पक्षाच्या दोन गटांमध्ये वाद झाला आणि राहुल गांधींना यामध्ये पडावे लागले. राहुल गांधी म्हणाले - 'सर्वांना सांगतोय की, आता हा मुद्दा सोडा आणि पुढे चला.'

मीटिंगमध्ये सहभागी गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक आणि पी चिदंबरम यांनी संघटनेची निवडणूक तात्काळ घेण्याची मागणी केली. मात्र अशोक गहलोत, अमरिंदर सिंह, एके एंटनी, तारिक अनवर आणि ओमान चांडी यांनी आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले की, पक्षाच्या अध्यक्षाची निवडणूक 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर व्हायला हवी.

गहलोत यांचा विरोधी गटावर निशाणा - सोनिया गांधींच्या लीडरशिपवर विश्वास नाही का?
लवकरच निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांना अशोक गहलोत म्हणाले - 'आपण कोणत्या अजेंड्यावर चालत आहोत. आपल्यासारख्या अंतर्गत निवडणुका घेण्याबाबत भाजप बोलत नाही? लवकर निवडणुका घेण्याची मागणी करणाऱ्यांना सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? संघटना निवडणुकांऐवजी राज्यातील निवडणुकांवर आपले लक्ष केंद्रित करणे आपले प्राधान्य असले पाहिजे.'

कॉंग्रेसच्या एका गटाची मागणी - अध्यक्ष पूर्णवेळ आणि सक्रिय असले पाहिजेत
CWC च्या शेवटच्या बैठकीत सभापतींबद्दल विरोधाचा सूर समोर आल्यानंतर पक्ष संघटनेच्या निवडणुका घेण्यात याव्या असा निर्णय घेण्यात आला होता. मे 2019 मध्ये राहुल गांधींनी कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष झाल्या. कॉंग्रेस नेत्यांचा एक गट पूर्णवेळ अध्यक्ष निवडला जावा, अशी मागणी करत आहे, जो सक्रियही राहावा.

गेल्या महिन्यात सोनिया यांनी नाराज नेत्यांची भेट घेतली होती
गेल्या वर्षी कॉंग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पक्षात मोठा फेरबदल करण्याची मागणी केली. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनीष तिवारी, भूपिंदरसिंग हूडा, मुकुल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी सोनिया यांनी गेल्या महिन्यात या नेत्यांसमवेत बैठक घेतली. राहुल आणि प्रियांका यांनीही या बैठकीला हजेरी लावली होती.