आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIIMS नंतर हॅकर्सची ICMRच्या वेबसाइटवर नजर:सुमारे 6 हजार वेळा वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील एम्सवर ​​​​​(AIIMS) सायबर हल्ला झाल्यानंतर तेथील यंत्रणा सुरळीत होण्यासाठी सुमारे आठ दिवस लागले होते. तर देशातील एवढ्या मोठ्या संस्थेच्या बेवसाईडवर सायबर हल्ला झाल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (ICMR) वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

6000 वेळा हॅकिंगचा प्रयत्न

देशाची राजधानी दिल्लीतील एम्सवर रॅन्समवेअर हल्ल्याच्या काही दिवसांनंतर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (ICMR) वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने सुत्राच्या हवाल्याने दिले आहे. त्यात म्हटले की, 30 नोव्हेंबर रोजी देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थेच्या वेबसाइटवर 6,000 वेळा हॅकिंगचे प्रयत्न करण्यात आले. आयपी अ‌ॅड्रेस, हा 'युनिक अ‌ॅड्रेसट जो इंटरनेटवरील डिव्हाईस ओळखतो, हा हाँगकाँगमधील ब्लॅकलिस्टेड आयपीमध्ये सापडला होता.

23 नोव्हेंबरला एम्सचे सर्व्हर हॅक झाले होते

दरम्यान, गेल्या आठवड्यात म्हणजेच 23 नोव्हेंबरला सकाळी 6.45 वाजता दिल्ली एम्सचे सर्व्हर हॅक करण्यात आले होते. सर्वप्रथम ही बाब इमर्जन्सी लॅबच्या कॉम्प्युटर सेंटरच्या निदर्शनास आली. त्यानंतर हळुहळू रॅन्समवेअर हल्ला करून हॉस्पिटलची संपूर्ण संगणकीय यंत्रणा हॅकर्सच्या ताब्यात गेली. तेव्हापासून सर्व्हर हॅकर्सच्या तावडीतून मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एकीकडे दिल्ली पोलीस या हॅकिंगचा तपास करत आहेत तर दुसरीकडे इंडिया कॉम्प्युटर इमर्जन्सी टीम (CERT-IN) चे तज्ज्ञ हॅकर्सचा ऑनलाइन सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. एम्समध्ये दरवर्षी 38 लाख रुग्णांवर उपचार केले जातात. या सायबर हल्ल्यामुळे रुग्णांचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे.

सायबर हल्ला; दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन

एम्सवर सायबर हल्ल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हे दोघेही सिस्टीम अ‌ॅनालिस्ट आहेत. दोघांना पूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. उत्तराने समाधान न झाल्याने एम्स प्रशासनाने दोघांनाही निलंबित केले आहे. दरम्यान, AIIMS चे 50 पैकी 30 सर्व्हरमध्ये अँटी व्हायरस बसवून स्कॅन करण्यात आले आहेत.

एम्स संदर्भातील या बातम्या देखील जरूर वाचा

1) एम्समध्ये सायबर हल्ल्याला ८ दिवस उलटले. ऑनलाइन सिस्टीम अजूनही बंद आहे. त्यामुळे रुग्णांबरोबरच डॉक्टरही हैराण आहेत.

2) सायबर हल्ले आणि सुरक्षेचे मोठे आव्हान, काय घ्याल काळजी वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...