आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Cyclone Amphan News In Photos | Cyclone Amphan Meteorological Department (IMD) Weather Alert For West Bengal Odisha Sikkim And Meghalaya Latest Today News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुपर सायक्लोन अम्फान:21 वर्षातील सर्वात मोठे वादळ बंगालमध्ये धडकले, 5 लाख नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर; ओडिशात दोघांचा मृत्यू

भुवनेश्वर/कोलकाताएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सायक्लोन आज 155 ते 165 किमी प्रती तासांच्या वेगाने सुंदरबनच्या किनारपट्टीवर धडकेल
 • अम्फान चक्रीवादळामुळे कोलकाता एअरपोर्ट उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत बंद करण्यात आले

सुपर सायक्लोन अम्फान किनारपट्टीवर धडकणे सुरुच आहे. याला पूर्ण होण्यास चार तास लागतील. हवामान विभागाने सांगितल्यानुसार, ही प्रक्रीया दुपारी अडीच वाजेपासून सुरू झाली होती. अम्फान सुंदरबनजवळ (पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांग्लादेश किनारपट्टीवर) धडकला. तर, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. किनारपट्टी क्षेत्रात 165-185 किमी प्रती तासांच्या वेगाने वारे वाहत आहेत. बांग्लादेशमध्ये एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे.

ओडिशाच्या चांदीपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून, पारादीपमध्ये वाऱ्याचा वेग 102 किमी प्रति तास झाला आहे. हवामान विभागाने सांगितल्यानुसार, हे वादळ दुपारी सुंदरबनजवळ (पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशमध्ये) 155 ते 165 किमी प्रती तासांच्या वेगाने धडकेल. आता हे पश्चिम बंगालच्या दिघापासून 125 किमी दक्षिण-दक्षिण पूर्वमध्ये आहे. धडकल्यानंतर या परिसरात 185 किमी प्रती तासांच्या वेगाने वारे वाहू शकतात. दरम्यान, सुरक्षेखातर कोलकाता विमानतळाला सकाळी 5 वाजेपर्यंत बंद करण्यात आले आहे. एनडीआरएफने सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये 5 लाख आणि ओडिशामधून 1.58 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणावर हलवण्यात आले आहे. ओडिशामध्येही आतापर्यंत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.

दोन्ही राज्यात एनडीआरएफचे काम सुरू

एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान यांनी सांगितल्यानुसार, दोन्ही राज्यात एनडीआरएपच्या टीम काम करत आहेत. 20 टीम ओडिशा आणि 19 टीम पश्चिम बंगालमध्ये आहेत. प्रभावित जिल्ह्यात 4 टीम्स किंवा त्यापेक्षा जास्त टीम तैनात करण्यात आल्या आहेत.  अतिरिक्त अलर्ट टीमदेखील तयार आहे. 24 टीम्स एअरलिफ्टसाठी स्टँडबायमध्ये आहेत.  

किती मोठे वादळ आहे?

देशात मागील 21 वर्षात अशा प्रकारचे सुपर सायक्लोन कधीच आले नव्हते. 1999 मध्ये एका चक्रीवादळाने ओडिशामध्ये धडकले होते. त्याला  सायक्लोन ओ-5 बी किंवा पारादीप सायक्लोन नाव देण्यात आले होते.

अपडेट्स

 • नेव्हीने पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये 20 जैमिनी बोटसोबत रेस्क्यू आणि मेडिकल टीम तयार केल्या.
 • विशाखापट्टनममध्ये आयएनएस देगा, अरकोणममध्ये आणि आयएनएस रजालीमध्ये नेव्हल एअरक्राफ्टला तयार राहण्यास सांगितले आहे.
 • बुधवारी सकाळपर्यंत ओडिशाच्या 11 जिल्ह्यातून 1.37 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. 1,704 बचाव शिबीर बांधण्यात आले आहेत.
 • माजी नेव्हल कमांडने म्हटले की, आम्ही सायक्लोनदरम्यान, कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तयार आहोत.
 • बचाव कार्यांसाठी नौसेनेचे जहाज स्टँडबायवर आहेत.

वाऱ्याचा वेग वाढत आहे

पश्चिम बंगालच्या दिघामध्ये मंगळवारी सुसाट्याच्या वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस झाला. तर, कोलकातामध्येही जोराच्या वाऱ्यासोबत पाऊस पडला. बुधवारी पारादीपमध्ये हवेचा वेग 102 किमी प्रती तास, चांदबालीमध्ये 74 किमी प्रती तास, भुवनेश्वरमध्ये 37 किमी प्रती तास, बालासोर 61आणि पुरीमध्ये 61 किमी प्रती तासांचा वेग होता.

वादळावर ममता बनर्जींचे लक्ष

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी मंगळवारी सांगितले होते की, त्या कंट्रोल रुममधून वादळावर लक्ष ठेवतील. आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त लोकांना किनारपट्टीवरुन काढून बचाव शिबिरांमध्ये पोहचवण्यात आले आहे. बंगाल सरकारने गुरुवारपर्यंत श्रमिक स्पेशल ट्रेन्स थांबवण्याची मागणी केली होती. येथील लोकांना एसएमएसच्या माध्यमातूनही अलर्ट पाठवण्यात येत आहेत. परिसर रिकामे करण्यासाठी टॉवर सायरनदेखील वाजवले जात आहेत. वादळाच्या परिस्थितीवर गृह मंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केली. शाह यांनी दोन्ही राज्यांना केंद्राकडून संपूर्ण मदत देण्याचा विश्वास दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...