आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Cyclone Amphan News Update | Weather Forecast Today News; India Meteorological Department (IMD) Cyclone Alert For West Bengal Odisha Bangladesh Coast

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाकाळात चक्रीवादळ:येत्या 6 तासात किनारपट्टीवर धडकेल 'अम्फान' चक्रीवादळ; पंतप्रधानांनी बोलवली हाय लेव्हल बैठक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान विभागाने म्हटले- मागील 6 तासांपासून 'अम्फान' उत्तर-उत्तरपूर्व भागाकडे वेगाने येत आहे
  • ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही किनारपट्टी भागात 130 किलोमीटर वेगाने हवा चालेल

कोरोनाकाळादरम्यान बंगालच्या खाडीमधून निघालेले चक्रीवादळ 'अम्फान'ने आता वेग पकडला आहे. खाडीच्या मध्य भागात रविवारी रात्री अडीच वाजेपासून याचे स्वरुप वाढण्यास सुरुवात झाली. भारतीय हवामान विभागानुसार, मागील 6 तासात हे वादळ खाडीच्या दक्षिण भागापासून उत्तरपूर्वेकडून वळाला असून, पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या काही किनारपट्टी भागात याचा परिणाम दिसू शकतो. 20 मे पर्यंत हे वादळ पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांग्लादेशच्या हटिया द्वीपवर येण्याची शक्यता आहे. यादरम्यान वादळाचा वेग 870 किलोमीटर प्रती तास होण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात वेगाने वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.तिकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वादळाचा सामना करण्यासाठी आणि यापासून होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी गृह मंत्रालय आणि नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (एनडीएमए)ची हाय लेव्हल बैठक संध्याकाळी 4 वाजता बोलवली आहे.

12 तासात वेग अजून वाढेल

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितल्यानुसार, 12 तासात या वादळाचा वेग वाढणार आहे. पुढील 6 तासात याचा परिणाम किनारपट्टी भागात दिसेल. वादळाचे केंद्र ओडिशाच्या पारादीपपासून 980 किमी. दक्षिण,पश्चिम बंगालच्या दीघापासून 1,30 किमी. दक्षिण-पश्चिम आणि बांग्लादेशच्या खेपुपारापासून 1,250 किमी. दक्षिण पश्चिममध्ये आहे. या वादळामुळे बंगालच्या खाडीच्या दक्षिण भागात सोमवारी सकाळी 150 किमी प्रती तास, मध्यमध्ये 190 किमी प्रती तासांच्या वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

या ठिकाणी होईल परिणाम

वादळामुळे पश्चिम बंगालच्या 24 उत्तर आणि दक्षिण परगना, कोलकाता, पूर्व आणि पश्चिमी मिदनापुर, हावड़ा आणि हुगलीमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. ओडिशामध्ये गजपती, गंजाम, पुरी, जगतसिंहपुर, केंद्रपाड़ा, बालासोर, भ्रदक, मयूरभंज, झुमपुरा, सहारपाड़ा आणि क्योंझर जिल्ह्यातही पाउसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या वादळाचा अंदाज पाहून एनडीआरएफच्या 10 टीम पश्चिम बंगालमध्ये आणि 7 टीम ओडिशामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...