आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Cyclone Amphan Update | India Meteorological Department (IMD) Cyclone Alert For West Bengal Odisha Bangladesh Coast

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगाल:देशात 21 वर्षांनंतर सुपर सायक्लोन : उद्या ताशी 195 किमी वेगाने बंगाल-ओडिशा किनाऱ्याला धडकणार अंफन चक्रीवादळ

भुवनेश्वर/नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • प. बंगाल आणि ओडिशात एनडीआरएफची 53 पथके,
  • ओडिशात 11 लाख लोकांना किनारपट्टीवरून हलवले

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अंफन या भीषण वादळ सोमवारी दुपारी २.३० वाजता तीव्र चक्रीवादळाचे रूप घेतले. १९९९ नंतर प्रथमच वादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे ओडिशा, प.बंगाल, आंध्र प्रदेशसह किनाऱ्यावरील ९ राज्यांत समुद्राच्या उंचच उंच लाटा उसळण्याबरोबरच मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी दुपारनंतर हे वादळ ओडिशा आणि प. बंगालच्या किनाऱ्याला धडकू शकते. त्या वेळी त्याचा वेग ताशी १९५ किमी राहील.

आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी सायंकाळी उच्चस्तरीय बैठक घेतली. प. बंगाल आणि ओडिशात एनडीआरएफची ५३ पथके पाठवण्यात आली आहेत. ओडिशातून ११ लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. प. बंगालमधील लोकांना किनाऱ्यावरुन दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. मच्छीमारांनी २१ मेपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा, प. बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयसाठी २१ मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

> १९ मे रोजी वादळाची गती १५५ किमी/ तास राहू शकते.

> २० मे रोजी त्याचा वेग १८५ किमी/ तास होण्याची शक्यता आहे.

> २१ मे रोजी वादळ मंदावेल, तेव्हा ९० किमी/ तास वेग राहण्याची शक्यता

पुढे काय : समुद्रकिनारी मुसळधार पाऊस, ४ मीटर उंचीच्या लाटा उसळतील

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांच्या मते, वादळाने उत्तर ओडिशात सर्वाधिक नुकसान होऊ शकते. मंगळवारी आणि बुधवारी याची तीव्रता जास्त राहील.

> जगतसिंहपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर जिल्ह्यांत वादळ अधिक तीव्र राहू शकते. कटकसह ८ इतर जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

> प.बंगालचा किनारी प्रदेश, पूर्व व पश्चिम मिदनापूर, २४ परगणा, हावडा, हुबळी, कोलकाता येथेही मुसळधार पाऊस आणि समुद्रात ३ ते ४ मीटर उंच लाटा उसळतील.

बातम्या आणखी आहेत...