आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Cyclone Anfan Kills 12 In West Bengal; The Speed Of The Storm Is Now Slowing Down To 27 Km Per Hour In The Last 6 Hours

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अम्फान चक्रीवादळ:बंगालमध्ये वादळामुळे 72 जणांचा मृत्यू, कोलकाता एअरपोर्ट पाण्याखाली; ममतांच्या अपीलनंतर नरेंद्र मोदी बंगालचा दौरा करणार

कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान विभागानुसार, पुढील तीन तासांत वेग आणखी कमी होण्याची शक्यता
  • बुधवारी ताशी 190 किमी वेगाने वाहत होते वारे, 5500 घरांचे नुकसान
  • आसाम, मेघालयात आज हलका पाऊस आणि 30-50 किमी प्रतितास वेगाने वारा वाहू शकतो

पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये बुधवारी हाहा:कार माजवल्यानंतर महाचक्रीवादळ अंफानचा जोर मंदायला सुरुवात केली आहे. हवामान विभागानुसार, मागील 6 तासांत अंफान 27 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने उत्तर-ईशान्यकडे सरकला आहे. पुढील तीन तासांत हे आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालयात आज हलका पाऊस आणि ताशी 30-50 कि.मी. प्रति तास वेगाने वारा वाहू शकतो.  वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये वार्‍याचा वेग बुधवारी ताशी 190 किलोमीटरपर्यंत पोहोचला होतो.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी म्हणाल्या की, वादळामुळे राज्यात 72 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात 5500 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे. हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले. मी असे दृष्य कधीच पाहिले नाही. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना राज्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची अपील केली. या अपीलनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी वादळामुळे प्रभावित परिसरांचा हवाई दौरा करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी शुक्रवारी कोलकातामध्ये पोहचतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करुन म्हटले की, बंगालमधील विनाशाचे दृष्य पाहिले. संपूर्ण देश बंगालसोबत आहे. राज्यातील नागरिकांसाठी प्रार्थना करतो. राज्याच्या मदतीसाठी कोणतीच कसर ठेवणार नाहीत.

कोलकातामध्ये पावसामुळे अनेक भागात पाणी साचले
कोलकातामध्ये पावसामुळे अनेक भागात पाणी साचले

6.6 लाख लोकांना आधीच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले 

बुधवारी दुपारी अडीच वाजता अंफान वादळ कोलकात्यात दाखल झाले. संध्याकाळी साडे सात वाजता हवेचा वेग मंदावला. या पाच तासांत वादळामुळे बरेच नुकसान झाले. वादळ येण्यापूर्वीच 6.6 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. बंगालमध्ये मागील तीन दिवसांत 5 लाख लोकांना किनारपट्टी भागातून निवारा गृहात हलविण्यात आले. ओडिशामध्ये 1.6 लाख लोकांना वाचविण्यात आले. हवामान विभागाचे डीजी मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, वादळाचा मार्ग आणि वेळेचे अचूक आकलन झाल्याने बचावात मोठी मदत झाली.

पश्चिम बंगालच्या अलीपूरमध्ये एनडीआरएफची टीम रस्त्यावर पडलेली झाडे हटवताना
पश्चिम बंगालच्या अलीपूरमध्ये एनडीआरएफची टीम रस्त्यावर पडलेली झाडे हटवताना

वादळामुळे ओडिशा आणि बंगालमधील किती जिल्हे प्रभावित?

ओडिशातील पुरी, गंजम, जगतसिंहपुर, कटक, केंद्रापाड़ा, जाजपूर, गंजाम, भद्रक आणि बालासोर हे 9 जिल्हे प्रभावित झाले. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील पूर्व मिदनापुर, 24 दक्षिण आणि उत्तर परगना यासोबत हावडा, हुबळी, पश्चिम मिदनापूर आणि कोलकातामध्ये या वादळाचा परिणाम झाला.  

बातम्या आणखी आहेत...