आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चक्रीवादळ:आज धडकणार अंफन महाचक्रीवादळ, 8 राज्यांना धोका, वादळामुळे मान्सूनला होणार उशीर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंफनमुळे 2 राज्यांत मोठे नुकसान, 8 राज्यांना धोका

(अनिरुद्ध शर्मा)

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले शतकातील पहिले महाचक्रीवादळ अंफन बुधवारी प. बंगालच्या किनाऱ्यावरील दिघा आणि बांगलादेशच्या हटियादरम्यान सुंदरबन भागात धडकेल. या वेळी त्याचा वेग ताशी १६५ किमीपर्यंत राहील. येथे समुद्रात ३ ते ४ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळतील. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, दोन दशकांतील वादळात अंफन सर्वात भीषण आहे. यामुळे केरळात मान्सून दाखल होण्यास उशीर होऊ शकतो. केरळात आता एकऐवजी पाच जून रोजी मान्सून येईल. वादळामुळे ओडिशा, प. बंगाल, केरळ, कर्नाटक, आसामसह १० राज्यांच्या किनारपट्टीवर पाऊस सुरू आहे.

परिणाम :२ राज्यांत मोठे नुकसान, ८ राज्यांना धोका

> प. बंगाल : प. बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोलकाता, हुबळी, हावडा, दक्षिण व उत्तर २४ परगणा, मिदनापूर या जिल्ह्यांना फटका बसू शकतो.

> ओडिशा : १२ जिल्ह्यांत वादळाने मुसळधार पावसाची शक्यता आहे. सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसू शकतो.

> सिक्कीम : काही भागांत मुसळधार पाऊस होईल. हिमालयाच्या पायथ्याशी हलका पाऊस होईल

> केरळ कर्नाटक : किनारी भागात जोराच्या वाऱ्यासह तीन दिवस मुसळधार पाऊस

> आसाम-मेघालय : अनेक भागांत २१ मेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता.

उत्तर आणि मध्य भारतावर परिणाम नाही :

उत्तर आणि मध्य भारतावर या महाचक्रीवादळाचा परिणाम होणार नाही. मात्र, जेव्हा हे वादळ गंगासागरच्या आसपास किनाऱ्याला धडकेल तेव्हा त्याचा वेग ताशी १६५ किमी राहील.

१७ मे रोजी शतकातील सर्वात मोठ्या वादळात झाले रूपांतर

> १५ मे रोजी विशाखापट्टणमपासून ९०० किमी अंतरावर आग्नेयेकडून दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले.

> १७ मे रोजी हे दिघापासून १२०० किमी अंतरावर होते. तेव्हा हे क्षेत्र वादळात रूपांतरित झाले आणि उत्तर-वायव्य दिशेला सरकले.

> १८ मे रोजी सायंकाळी ते महाचक्रीवादळ बनले. मंगळवारी दुपारी ताशी २०० ते २४० किमी वेगाने वारे वाहत आहेत

बातम्या आणखी आहेत...