आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवसांनी येणार वर्षातील पहिले चक्रीवादळ:बंगाल-ओडिशात मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग 90 किमी प्रतितास राहील

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष 2022 मधील पहिले चक्रीवादळ असनी 10 मे रोजी भारताच्या किनारपट्टी भागात धडकू शकते. हवामान खात्याने बंगाल आणि ओडिशाच्या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग 90 किमी प्रति तासापर्यंत राहू शकतो, असे विभागाने म्हटले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, असनी चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी अंदमान समुद्रातून बंगालच्या उपसागराकडे सरकणार आहे. यानंतर 8 पासून बंगाल, ओडिशा आणि झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल. हे चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्रच्या किनारपट्टीवर धडकू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या दरम्यान, वाऱ्याचा वेग 75 ते 90 किमी प्रति तास इतका असू शकतो.

ओडिशामध्ये हाय अलर्ट, मच्छिमारांसाठी इशारा
ओडिशाचे विशेष मदत आयुक्त पीके जेना यांनी सांगितले की, शनिवारी आम्ही NDRF आणि ODRAF पथकांना फिल्डवर उतरण्याची सूचना देऊ. ते म्हणाले की, भारतीय तटरक्षक दलाच्या सूचनेनंतर आम्ही मच्छिमारांना समुद्रात न जाण्यास सांगितले आहे. राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला तोंड देण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे.

असनी चक्रीवादळाचा या राज्यांवर परिणाम होणार
असनी चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा व्यतिरिक्त पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, आंध्र प्रदेश, झारखंड, ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये दिसून येईल. IMD ने ओडिशासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

पाच महिन्यांनी चक्रीवादळ
याआधी डिसेंबर २०२१ मध्ये जावाद चक्रीवादळ भारतात आले होते. त्याच वेळी, गुलाब चक्रीवादळ सप्टेंबर 2021 मध्ये धडकले, तर मे 2021 मध्ये, यास चक्रीवादळाने बंगाल, बिहारसह अनेक राज्यांमध्ये कहर केला होता.

बातम्या आणखी आहेत...