आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुलाब चक्रीवादळाने आपले रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली आहे. रविवारी संध्याकाळी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही या चक्रीवादळाचे परिणाम पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दक्षिण छत्तीसगड, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस झाला असून अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे.
या चक्रीवादळामुळे झारखंडच्या दक्षिण आणि मध्य जिल्ह्यांमध्येही पाऊस पडू शकतो. छत्तीसगडमध्ये जगदलपूरपासून 90 किमी दक्षिण-पूर्व मध्ये याचा परिणाम दिसू शकतो. उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशावर 'गुलाब' हे चक्रीवादळ रात्री अडीच वाजता आंध्र प्रदेशमध्ये कमकुवत होत डीप डिप्रेशनमध्ये बदलले आहे. पुढील 12 तासांत याचा वेग हळूहळू कमी होणार आहे.
डीप डिप्रेशन म्हणजे काय?
महासागराच्या उबदार प्रदेशात उष्णतेपासून हवा गरम होते, ज्यामुळे कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार होते. हवा उबदार होते आणि वरच्या आर्द्रतेसह घनतेमुळे ढग तयार होतात. या कारणामुळे, रिक्त जागा भरण्यासाठी ओलसर हवा वेगाने खाली येते. जेव्हा वारा त्या भागाभोवती खूप वेगाने फिरतो, तेव्हा दाट ढगांसह पाऊस पडतो या प्रक्रियेला डीप डिप्रेशन असे म्हणतात.
पाकिस्तानने या वादळाला दिले नाव
हवामान खात्याच्या मते, पाकिस्तानने या वादळाला गुलाब हे नाव दिले आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्था/एशिया-पॅसिफिकसाठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग आणि सायक्लोनिक स्टॉर्मसवर तयार केलेल्या पॅनलने तयार केलेल्या यादीतून हे नाव काढण्यात आले आहे. या पॅनेलमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका यासह 13 देश या प्रदेशात येणाऱ्या वादळांची नावे निवडतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.