आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूमध्ये कहर केल्यानंतर, मांडस चक्रीवादळ आता दक्षिण आंध्र प्रदेशकडे सरकले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा ममल्लापुरम किनारपट्टीला धडकल्यानंतर चक्रीवादळ कमकुवत झाले. शनिवारी सकाळी वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळपासून राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार वारा आणि वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली असून रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे.
त्याचवेळी चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे 13 उड्डाणे रद्द करावी लागली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ४८ ते ५६ तास पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रविवारपर्यंत राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन (GCC) ने लोकांना चक्रीवादळ मांडस कमकुवत होईपर्यंत बाहेर जाण्याचे टाळण्याची विनंती केली आहे.
पहिले तामिळनाडूमध्ये मांडस चक्रीवादळामुळे झालेल्या विनाशाचे काही फोटो पाहा...
पुद्दुचेरी- कराईकलमध्ये शाळा-कॉलेज बंद
ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या आयुक्तांनी मांडस चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन लोकांना त्यांची वाहने झाडांजवळ पार्क न करण्याचे सांगितले आहे. सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच नागरिकांना शुक्रवार आणि शनिवारी समुद्रकिनारी न जाण्यास सांगण्यात आले आहे. शिक्षण मंत्री ए नमाशिवम यांनी सांगितले की, पुद्दुचेरी आणि कराईकलमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.
आंध्र प्रदेशात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस
तामिळनाडूसह वादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशातही मुसळधार पाऊस सुरू आहे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तिरुमला तिरुपती येथे शुक्रवारी पावसामुळे गोंधळ उडाला. बालाजीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
चार दिवसांसाठी अलर्ट जाहीर
वादळाच्या प्रभावामुळे ४८ ते ५६ तास पाऊस सुरू राहू शकतो. यादरम्यान जोरदार वाऱ्यामुळे झाडे आणि घरांचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने गुरुवार ते रविवार असा अलर्ट जारी केला आहे. यावेळी लोकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्यास आणि प्रशासनाच्या सल्ल्याचे पालन करण्यास सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.