आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बंगालच्या खाडीतून सुरू झालेलेल निवार वादळ आता पुडुचेरीपासून 120 किलोमीटर दूर आहे आणि याचा वेग 11 किमी/तास आहे. हे वादळ आज रात्री 2 वाजता दक्षिण किनारपट्टीवर दाखल होईल. यानंतर वादळ कराईकल (आंध्र प्रदेश) आणि महाबलीपुरम (तमिळनाडू)ला पार करेल. येथून जाताना 145 किमी प्रती तासांच्या वेगाने वारा असेल. बचाव कार्यासाठी INS ज्योती तमिळनाडुत दाखल झाली असून, INS सुमित्र विशाखापट्टनममधून रवाना झाली आहे.
निवारमुळे चेन्नई एअरपोर्ट आज संध्याकाळी 7 वाजेपासून उद्या सकाळी 7 पर्यंत बंद कऱण्यात आले आहे. तसेच, 26 फ्लाइटदेखील कँसल केल्या आहेत. तमिळनाडुतील 16 जिल्ह्यांमध्ये उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
चेंबरमबाक्कम धरण उघडले, नदी किनारी अलर्ट
चेन्नईत 2015 मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, त्यामुळे 90% भरलेले चेंबरमबाक्कम धरण उघडण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या फेजमध्ये धरणातून 1000 क्यूसेक पाणी सोडण्यात येईल. धरणातील पाणी अडयार नदीत जाईल, त्यामुळेच नदीजवळ अललेल्या कुंद्रातुर, सिरुकलाथुर, तिरुमुडिवक्कम आणि तिरुनीरमलईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिकडे, केंद्रीय जलसंपदा मंत्रालयानेही याबाबत अलर्ट जारी करुन चेन्नई विमानतळावर सतर्क राहण्यास सांगितले आहे.
पावसामुळे धरणात 11,000 क्युसेक पाणी वाढण्याचा अंदाज
2015 मध्ये चेंबरमबाक्कम धरणाला कोणत्याही प्लानिंगशिवाय उघडल्यामुळे चेन्नईमध्ये पूर आल्याचे मानले जाते. पण, अधिकाऱ्यांचे म्हणने आहे की, यावेळेस चिंता करण्याची गरज नाही. धरणाची क्षमता 24 फूट आहे, त पाण्याचा स्तर 22 फुटापर्यंत आहे. धरणातील पाणी सोडल्यानंतरही पावसामुळे धरणात अतिरिक्त 11,000 क्युसेक पाणी येण्याची शक्यता आहे. या अतिरिक्त पाण्याला अडयार नदीत सोडले जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.