आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cyclone Tauktae Gujarat Latest Update; Kerala Rain News | Maharashtra Gujarat Karnataka Weather Forecast Latest Photos And Videos

'तौक्ते'चा धोका वाढला:कर्नाटकच्या 6 जिल्ह्यांमध्ये परीणाम, 4 जणांचा मृत्यू; मुंबईमध्ये मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर 580 कोरोना रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गंभीर चक्रीवादळ मोठ्या वादळात रुपांतरीत होण्याची शक्यता

गुजरात आणि महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये अरबी समुद्रातील तौक्ते वादळाचा धोका आहे. कर्नाटकच्या 6 जिल्ह्यांवर याचा खूप वाईट परीणाम झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये 73 गावांवर याचा परीणाम झाला आहे. राज्यांमध्ये आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. या 6 जिल्ह्यांमधून 3 समुद्र किनाऱ्यापासून जवळ आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांपासून पाऊस पडत आहे. येथे 90 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहत आहेत. मुख्यमंत्री येदियुरप्पा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या वादळाने गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार हजेरी लावली आहे. आता तो गुजरातच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे मुंबईसह उत्तर कोकणात काही ठिकाणी रविवारपासून जोरदार वारा आणि भरपूर पाऊस होऊ शकतो. खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिके(BMC)ला कोविड केअर सेंटरमधील 580 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. बीकेसीमधून 243, दहिसरमधून 183 आणि मुलुंडमधून 154 रुग्णांना बाहेर काढण्यात आले.

गंभीर चक्रीवादळ मोठ्या वादळात रुपांतरीत होण्याची शक्यता
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या 12 तासांत हे अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. 18 मेच्या सकाळी गुजरातच्या पोरबंदर आणि महुआ कोस्ट येथून हे वादळ जाईल. दरम्यान, चक्रीवादळासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. यामध्ये मदत व बचाव कार्याच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. या व्हर्चुअल बैठकीत महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त दमण आणि दीव व दादरा नगर हवेलीचे अधिकारीही उपस्थित होते.

वारा 160 किमी / तासाच्या वेगाने वाहू शकतो
IMD नुसार शनिवारी दुपारी अडीच वाजता चक्रीवादळ गोव्याच्या पणजी किनाऱ्यापासून 150 कि.मी. दक्षिण पश्चिममध्ये, मुंबईपासून 490 किमी दक्षिणेस, गुजरातमधील वेरावळच्या दक्षिण-नैऋत्याकडे होते. वादळ दरम्यान, पावसासह 150 ते 160 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात. या वादळाचा परिणाम तीन दिवस महाराष्ट्र, केरळ आणि गुजरातच्या किनारपट्टीवर होण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम राजस्थान आणि लक्षद्वीपवरही होऊ शकतो. या चक्रीवादळाचे नाव म्यानमारने 'तौक्ते' ठेवले आहे.

NDRF च्या 53 टीम अलर्टवर
NDRF चे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी शुक्रवारी सांगितले - केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र या किनारपट्टी भागात एनडीआरएफची 53 पथके तैनात आहेत.

वायुसेना अलर्ट; मच्छिमारांना दिला इशारा

  • वादळाची शक्यता पाहता भारतीय हवाई दलही अलर्ट मोडमध्ये आहे. हवाई दलाने 16 परिवहन विमान आणि 18 हेलिकॉप्टरला मदत व बचाव कार्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
  • गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्रच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळासाठी तटरक्षक दल सतर्क आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रापासून दूरच राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...