आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cyclone Tauktae Latest Update: Storm Warning Issued By Meteorological Department In Andaman And Nicobar; News And Live Updates

'तौक्ते'नंतर आणखी एक आपत्ती:अंदमानजवळील समुद्रात तयार होत आहे एक नवीन वादळ; IMD ने सांगितले - हे वादळ 23 मे रोजी पूर्व किनारपट्टीवर धडकणार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्याची ट्रॅक, दिशा आणि इतर माहिती एक किंवा दोन दिवसांत स्पष्ट करण्यात येणार आहे.

देशात 'तोक्ते' चक्रीवादळाने हाहाकार माजवला असून यामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळातून देश नेमका सावरत आहे. तर दुसरीकडे हवामान खात्याने आणखी एक चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा दिला आहे. अंदमानजवळील समुद्रात एक नवीन वादळ तयार होत असून येत्या 23 मे रोजी ते पूर्व किनारपट्टीकडे सरकणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्याची ट्रॅक, दिशा आणि इतर माहिती एक किंवा दोन दिवसांत स्पष्ट करण्यात येणार आहे.

'तोक्ते' चक्रीवादळ सोमवार रात्री गुजरातमध्ये धडकले
हे चक्रीवादळ आधी कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा यांच्यानंतर गुजरात राज्यात धडकले. यामुळे वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. झाडे उमळून पडली होती. दरम्यान, या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र राज्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमध्ये 23 वर्षानंतर इतके भयानक वादळ
गुजरातमध्ये 23 वर्षानंतर इतके मोठे वादळ आले आहे. यापूर्वी, 9 जून 1998 मध्ये कच्छ जिल्ह्यातील कांडलामध्ये वादळ आले होते. त्यात 1173 लोकांचा मृत्यू आणि 1774 जण बेपत्ता झाले होते. सध्या गुजरातच्या किनारपट्टी भागातील जवळपास 1.5 लाख लोकांना इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पश्चिम किनारपट्टीवरुन हजारो घरे रिकामे करण्यात आले आहेत.

कोणत्या राज्यात किती मृत्यू
कर्नाटकच्या विविध जिल्ह्यात आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील जळगावमध्ये रविवारी दुपारी एक झाड झोपडीवर पडल्याने 17 आणि12 वर्षांच्या दोन बहिणींचा मृत्यू झाला, तर आईची तब्येत गंभीर आहे. तसेच, गोवा राज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तिकडे तमिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये भिंत कोसळून दोनजण दगावले आहेत.

गुजरातला सर्वाधिक फटका
हवामान विभागाने सांगितले की, या वादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसला. द्वारका, कच्छ, पोरबंदर, जुनागड, गिर सोमनाथ, अमरेली, राजकोट, मोरबी आणि जामनगर जिल्ह्यातील कच्चे घर पूर्णपणे उद्धवस्त झाली, तर पक्क्या घरांनाही काही प्रमाणात नुकसान पोहोचले.

बातम्या आणखी आहेत...