आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cyclone Tauktae Navy Rescue Search Operation Update; High Resolution Side Scan Sonars | P 305 Ship Latest News Today

'तौक्ते'नंतर समुद्रात बचावकार्याचा सहावा दिवस:आतापर्यंत 60 मृतदेह ताब्यात, बेपत्ता लोकांच्या तपासासाठी 'साइड स्कॅन सोनार' सिस्टम आणि 6 डायविंग टीम करत आहेत कार्य

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'साइड स्कॅन सोनार'ने आज घेतला जातोय शोध

अरबी समुद्रात चक्रीवादळ तौक्तेनंतर 17 मे रोजी बुडलेल्या पी -305 या जहाजात बसलेल्या 261 पैकी 13 जणांचा शोध आजही सुरू आहे. आतापर्यंत 60 लोकांचे मृतदेह सापडले आहेत आणि 188 लोकांना सुखरुप वाचवण्यात आले आहे. पी -305 सह टगबोट 'वरप्रदा' मध्ये बसलेले 11 लोक बेपत्ता आहेत. 80 तासांहून अधिक काळ उलटल्यानंतरही हे सर्व जिवंत राहण्याची शक्यता धूसर होत असल्याचे दिसते.

'साइड स्कॅन सोनार'ने आज घेतला जातोय शोध
नेवी आणि कोस्टगार्डकडून चालवण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशनचा आज 6 वा दिवस आहे. उर्वरीत लोकांचा शोध घेण्यासाठी 'साइड स्कॅन सोनार' आणि INS तरासासोबत INS मकरच्या पाणबुड्या लावण्यात आल्या आहेत. P-305च्या बेपत्ता क्रू मेंबर्समध्ये जहाजाचे कॅप्टन राकेश बल्लभ यांचाही समावेश आहे. वादळ आल्यानंतर त्यांनी समुद्रात उडी मारली होती. त्यांच्यावर मुद्दामून लोकांचा जीव धोक्यात टाकल्याचा आरोप आहे.

‘INS मकर’ ला कर्नाटकने मुंबईमध्ये आणले
INS मकर एक सर्वेक्षण जहाज आहे. नौसेना याचा वापर हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी करते. या अपघातानंतर याला कर्नाटकातून मुंबईच्या तटावर आणण्यात आले आहे.

असे काम करते 'साइड स्कॅन सोनार'
समुद्रात व्हिजिबिल्टी कमी झाल्यानंतर एका मोठ्या क्षेत्रात तपासासाठी 'साइड स्कॅन सोनार'चा वापर केला जातो. हाय रेजोल्यूशनच्या या सोनार सिस्टममधून समुद्राच्या तळाशी असलेल्या गोष्टींचा फोटो प्राप्त केला जाऊ शकतो. आपण शोध घेत असलेल्या वस्तूच्या ओळखीनंतर पाणबुडी तेथे जाऊन ती वस्तु किंवा व्यक्तीचे रेस्क्यू करु शकते.

6 डायविंग टीम या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये गुंतल्या
आजच्या ऑपरेशनचे नेतृत्व करत असलेले कमोडोर मनोज झा म्हणाले, 'INS मकर सहा डायविंग टीमसह रवाना झाला आहे. ज्यामधील प्रत्येकात 5 ते 6 पाणबुड्या आहेत. या पाण्यात बुडालेल्या बार्जच्या आत अडकलेल्या मृतदेहांचाही शोध घेतील.पाणबुड्या दल, सोनारच्या सिग्नलच्या आधारावर शोधमोहिम करेल.'

या ऑपरेशनमध्ये 7 INS जहाज लागतील
लो ड्राफ्टचे जहाज INS तरासाही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सामिल असणार आहे. यापूर्वी नौदलाने 4 दशकातील सर्वात मोठ्या रेस्क्यू मिशनमध्ये INS कोची आणि कोलकाता व्यतिरिक्त INS तेग, INS तलवार आणि INS बेतवाला तैनात केले होते. तटरक्षक दलाने सुभद्रा कुमारी चौहान, संकल्प, समर्थ, सम्राट, समुद्र प्रहरी, सचेत आणि अपूर्व अशी जहाजे तैनात केली होती.

नौदल आणि कोस्ट गार्ड हेलिकॉप्टरही शोधकार्यात
नौदल आणि कोस्ट गार्डचे हेलीकॉप्टरही मृतदेह आणि जिवंत राहिलेल्या लोकांच्या शोधासाठी समुद्र किनाऱ्याजवळ सतत उड्डाण करत आहेत. 'सी किंग' हेलिकॉप्टर आणि चेतकच्या मदतीसाठी नौदलाला गोव्यातून दोन हलके हेलिकॉप्टर मिळाले आहेत. दोन डोर्निअर 228 विमान, ज्यातून कमी अंतरावर उड्डाण करता येते ते किनारपट्टीवर उड्डाण करत आहेत. वाचलेल्या किंवा मृत व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शोध पथकाच्या प्रत्येक सदस्याकडे खास दुर्बिणी आहेत. तटरक्षक दलाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्यांचे मृतदेह बाहेर काढले गेले आहेत ते अत्यंत खराब स्थितीत आहेत जे त्यांना तत्काळ किनाऱ्यावर पोहोचवायचे आहेत.

बातम्या आणखी आहेत...