आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cyclone Tauktae Tracking Update; Gujarat Mumbai News | Cyclonic Storm Tauktae Latest News Photo Video, Indian Meteorological Department Rain Alert Today

चक्रीवादळ 'तौक्ते':गुजरात किनारपट्टीला धडकले वादळ; सोमनाथ, वेरावळ, ऊना आणि कोडिनारमध्ये हवेचा वेग 80 ते 130 प्रतितास

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसू शकतो

अरबी समुद्रातून सुरू झालेले 'तौक्ते' वादळ गुजरात किनारपट्टीला धडकले आहे. हवामान विभागानुसार, याची लँडफॉल प्रोसेस सुरु झाली आहे. ही प्रोसेस पुढील 2 तास सुरु राहील. याच्या प्रभावाने 4 जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरु झाला आहे. नवसारी जिल्हयातील काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. खबरदारी म्हणून कांठा विभागातील 16 गावात वीज तोडण्यात आली आहे. गीर सोमनाथच्या ऊना गावात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 200 झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे वीजप्रवाह खंडित झाला आहे.

वेरावळ, सोमनाथ, ऊना, कोडिनारमध्ये 80 ते 130 किमी प्रतितासाने सोसाट्याचा वारा सुरु आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गांधीनगरच्या स्टेट कंट्रोल रूममध्ये पोहोचले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून किनारपट्टी भागातील जिल्ह्यांचा तसेच राज्यातील स्थितीचा आढावा घेतला.

थोड्या वेळात 'तौक्ते' वादळ सौराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. येथे सर्वात जास्त 10 इंच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे जुनागढ, भावनगर, गीर सोमवार, पोरबंदर आणि अमरेली जिल्ह्यातही याचा परिणाम जाणवेल. राज्यातील 21 जिल्ह्यातील 24 तहसील क्षेत्रात पाऊस सुरु आहे. काही गावांमध्ये 1-1 इंच पाऊस झाला आहे. या वादळाचा धोका राजस्थानपर्यंत आहे. वादळ दरम्यान हवेची गती 175 किलोमीटर प्रतितास जाऊ शकते.

जमिनीला स्पर्श झाल्यानंतर हे वादळ कमकुवत होईल, मात्र संपूर्ण गुजरातमध्ये वादळाचा परिणाम झाल्यामुळे दिवसभर मुसळधार ते जोरदार पाऊस पडेल. राजस्थानात पोहोचेपर्यंत, वादळ कमकुवत होऊन डीप डिप्रेशनमध्ये बदलेल. 18 मे रोजी दुपारपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये बदलत हिमालयाच्या दिशेने जाईल.

गुजरातमध्ये 23 वर्षानंतर इतके मोठे वादळ आले आहे. यापूर्वी, 9 जून 1998 मध्ये कच्छ जिल्ह्यातील कांडलामध्ये वादळ आले होते. त्यात 1173 लोकांचा मृत्यू आणि 1774 जण बेपत्ता झाले होते. सध्या गुजरातच्या किनारपट्टी भागातील जवळपास 1.5 लाख लोकांना इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पश्चिम किनारपट्टीवरुन हजारो घरे रिकामे करण्यात आले आहेत.

भारतीय हवामान विज्ञान विभाग (IMD) चे डायरेक्टर जनरल (DG) मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, राज्यातील 17 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या राज्यात किती मृत्यू

कर्नाटकच्या विविध जिल्ह्यात आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील जळगावमध्ये रविवारी दुपारी एक झाड झोपडीवर पडल्याने 17 आणि12 वर्षांच्या दोन बहिणींचा मृत्यू झाला,तर आईची तब्येत गंभीर आहे. तसेच, गोवा राज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तिकडे तमिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये भिंत कोसळून दोनजण दगावले आहेत.

गुजरातला सर्वाधिक फटका

हवामान विभागाने सांगितले की, या वादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसेल. द्वारका, कच्छ, पोरबंदर, जुनागड, गिर सोमनाथ, अमरेली, राजकोट, मोरबी आणि जामनगर जिल्ह्यातील कच्चे घर पूर्णपणे उद्धवस्त होतील, तर पक्क्या घरांनाही काही प्रमाणात नुकसान पोहोचेल.

बातम्या आणखी आहेत...