आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये तौक्ते वादळ:राजकोट-जुनागढमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, सोमनाथजवळ समुद्रात 5 बोटी अडकल्या

अहमदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर सोमवारी रात्री तौक्ते चक्रीवादळ गुजरातला पोहोचले. यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा ठप्प झाला आहे. झाडे उन्मळून पडली आहेत. चक्रीवादळ दीवला स्पर्श करून उना येथून भावनगरला पोहोचले आहे. भावनगरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.

भावनगरमध्ये अनेक ठिकाणी झाडे पडल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर वादळामुळे गीर सोमनाथ जिल्ह्यातही वादळाचे तांडव पाहण्यास मिळाले आहे. सोमनाथजवळ पाच बोटी अडकल्याची माहिती मिळाली असून बचावकार्य सुरू आहे. वादळाचा परिणाम आज दुपारी 12 वाजेपर्यंत राहू शकतो.

जुनागडमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार वार्‍यासह पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. याशिवाय शहरातील गांधी चौक परिसरातील सिटी राइड बसवर होर्डिंग कोसळले. यामुळे गांधी चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता बंद होता. या घटनेची माहिती मनपाला समजताच होर्डिंग हटविण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.

या वादळाचा मोठा परिणाम सोमनाथावर दिसत आहे. येथे वारा ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहत आहे. तसेच मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण शहरी भागात वीज गेली आहे. दरम्यान, राजकोटच्या एटकोट, जसदान व लगतच्या भागातही मुसळधार पाऊस पडला असून वीजपुरवठा ठप्प झाला आहे. राजस्थानात पोहोचताच तौक्ते चक्रीवादळ कमकुवत होईल आणि तीव्र डिप्रेशनमध्ये बदलेल. आज दुपारपर्यंत ते कमी दाबाच्या प्रदेशात बदलत हिमालयच्या दिशेने जाईल.

बातम्या आणखी आहेत...